Share

“कुणाल कामराने ठाकरे गटाची सुपारी घेऊन…. ,” Sanjay Nirupam यांचा गंभीर आरोप

by MHD
Sanjay Nirupam accuses Uddhav Thackeray over Kunal Kamra song

Sanjay Nirupam । स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने (Kunal Kamra) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर सादर केलेल्या गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरून आता शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी ठाकरे गटाला टार्गेट केले आहे.

“तुम्ही आमच्या नेत्याला सांगता की तुम्ही गद्दार आहात. पण तुम्हाला गद्दारीचा अर्थ माहिती आहे का? 2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात 40 पेक्षा जास्त शिवसेना आमदारांनी उठाव केला, ती गद्दारी नव्हती. शिवसेनेला योग्य दिशा मिळण्यासाठी केलेला प्रयत्न होता,” असे संजय निरुपम म्हणले.

“कुणाल कामराने ठाकरे गटाची सुपारी घेऊन आमच्या नेत्यांविरोधात एवढा मोठा आरोप केला आहे. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले आहेत. त्याचा एक काल नमुना रात्री दिसला,” असा गंभीर आरोप संजय निरुपम यांनी केला.

पुढे ते म्हणाले की, “कुणाल कामरा हा संजय राऊत यांचा खास माणूस आहे. यापूर्वी हा कामरा काँग्रेसच्या इकोसिस्टीमचा सदस्य आहे. राहुल गांधींबरोबर फिरतो. सुप्रिया सुळे आणि शरद पवारांसोबतही त्यांच्या भेटीगाठी होतात,” असा दावा निरुपम यांनी केला

Sanjay Nirupam on Kunal Kamra Controversy

“कामराने ज्या स्टुडिओमध्ये त्याने शुटिंग केले त्यासाठीचा पैसा मातोश्रीतून आला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पैसे दिले होते,” असा आरोप संजय निरुपम यांनी केला. यावर आता ठाकरे गट त्यांना काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

महत्त्वाच्या बातम्या :

Sanjay Nirupam has made serious allegations against the Thackeray group over a song performed on Eknath Shinde.

Politics Maharashtra Marathi News