Share

Samsung Galaxy S25 Ultra वर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट, फिचर्स आहे एकच नंबर

Earlier this year, the company launched its premium flagship smartphone, the Samsung Galaxy S25 Ultra, in India, which you can buy at a cheap price.

by MHD

Published On: 

Discount on Samsung Galaxy S25 Ultra

🕒 1 min read

Samsung Galaxy S25 Ultra । काही दिवसांपूर्वीच सॅमसंगने (Samsung) आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy S25 Ultra लॉंच केला आहे. जर तुम्हाला हा फोन स्वस्तात खरेदी करायचा असेल तर तुमच्याकडे एक शानदार ऑफर आहे. यामुळे तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकता.

Discounts on Samsung Galaxy S25 Ultra

या वर्षाच्या सुरूवातीला कंपनीने आपला प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी एस 25 अल्ट्रा भारतात लाँच केला. हा फोन स्नॅपड्रॅगन 8 Elite चिपसेट आणि One UI 7 सॉफ्टवेअरसह खरेदी करता येईल. फोनची किंमत (Samsung Galaxy S25 Ultra Price) थोडी जास्त असल्याने काही ग्राहक ते खरेदी करण्यास टाळाटाळ करत होते.

पण आता सॅमसंगने या फोनवर 11,000 रुपये सवलत मिळेल. जर ग्राहक एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड वापरुन पैसे देत असल्यास त्यांना ही धमाकेदार सवलत मिळेल. याशिवाय ईएमआय पर्याय निवडण्यावर 9,000 पर्यंत सवलत मिळेल.

या ऑफर अंतर्गत, या फोनचे 12GB + 256GB व्हेरिएंट 1,18,999 रुपये, 12GB + 512GB व्हेरिएंट 1,30,999 आणि 12GB + 1TB व्हेरिएंट 1,54,999 रुपयांना खरेदी करता येईल. ही ऑफर सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट, फ्लिपकार्ट, Amazon आणि रिलायन्स डिजिटलवर लागू असेल.

Features of Samsung Galaxy S25 Ultra

या फोनचा डिस्प्ले 6.9 इंचाचा असून या फोनचे वजन 218 ग्रॅम आहे. तसेच फोनमध्ये 5000 एमएएचक्षमतेची मोठी बॅटरी कंपनीने दिली आहे. या शानदार फोनमध्ये 200 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा मिळेल.

फोनमध्ये 5 एक्स ऑप्टिकल झूमसह 50 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स मिळेल. सेकंडरी 10 मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा असून जो 3 एक्स ऑप्टिकल झूम देतो. एस 25 अल्ट्रामध्ये 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Marathi News Mobile Technology

Join WhatsApp

Join Now
by MHD

🕘 संबंधित बातम्या