Samsung । जर तुम्ही कमी किमतीत नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही सॅमसंगचे (Samsung smartphone) नुकतेच लाँच झालेले नवीन फोन खरेदी करू शकता. यात तुम्हाला जबरदस्त फीचर्स मिळतील.
Samsung Galaxy M16 and Galaxy M06 Price
कंपनीने नुकतेच सॅमसंग गॅलेक्सी एम 16 (Samsung Galaxy M16) आणि गॅलेक्सी एम 06 फोन (Samsung Galaxy M06) लाँच केले आहेत. किमतीचा विचार केला तर सॅमसंग गॅलेक्सी एम 16 5 जी स्मार्टफोन 11,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत (Samsung Galaxy M16 Price) भारतात लाँच करण्यात आला आहे.
तर गॅलेक्सी एम 06 स्मार्टफोनची किंमत 9,499 रुपयांपेक्षा (Samsung Galaxy M06 Price) कमी किमतीत खरेदी करता येईल. तुम्ही सॅमसंगचे हे दोन्ही Amazon, कंपनीची अधिकृत वेबसाइट आणि काही निवडक किरकोळ स्टोअरमधून खरेदी करू शकता. सॅमसंग गॅलेक्सी एम 16 चा सेल 5 मार्च रोजी आणि सॅमसंग गॅलेक्सी एम 06 चा सेल 7 मार्च रोजी सुरू होईल.
Features of Samsung Galaxy M16 5G
सॅमसंग गॅलेक्सी एम 16 स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.7 इंचाचा एफएचडी सुपर एमोलेड डिस्प्ले पाहायला मिळेल. ज्याचा दर 90 हर्ट्ज असून जे प्रदर्शन आय-केअर शिल्ड आणि व्हिजन बूस्टर समर्थनासह येते. हे लक्षात घ्या की कंपनीच्या बजेट मिड रेंजमधील हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंशन 6300 एससीसह येतो. हा फोन 4, 6 आणि 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज पर्यायामध्ये खरेदी करता येईल.
या फोनमध्ये 5000 एमएएचची बॅटरी आहे. या फोनमध्ये ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्याचा प्राथमिक कॅमेरा 50 एमपी असून त्यात 5 एमपीचे अल्ट्रा वाइड एंगल लेन्स आणि 2 एमपी मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील मिळेल.
Features of Samsung Galaxy M06 5G
या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा एचडी आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला असून ज्याचा रीफ्रेश दर 90 हर्ट्ज आहे. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंशन 6300 एससी आहे. यात 4, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी अंतर्गत स्टोरेज आहे.
फोन Android 15 वर आधारित वन यूआय वर काम करेल आणि 50 एमपी प्राथमिक कॅमेरा आणि 2 एमपी मॅक्रो कॅमेरा मिळेल. तर या फोनला 8 एमपी फ्रंट कॅमेरा मिळेल. या फोनमध्ये 5,000 एमएएच बॅटरी मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या :