Santosh Deshmukh । संतोष देशमुख हत्याप्रकरणाला (Santosh Deshmukh murder case) अडीच महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेला आहे. तरीही त्यांना न्याय मिळाला नाही. याप्रकरणामुळे तपास यंत्रणेची पुरती झोप उडाली आहे. अशातच आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
ज्या खंडणी प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाली होती, त्या खंडणी प्रकरणाचा आता तपास पूर्ण झाला आहे. आज सीआयडीकडून (CID) विशेष मकोका कोर्टामध्ये 1400 ते 1500 पानांचे आरोपपत्र दाखल केले जाणार आहे.
या आरोपपत्रामध्ये अनेक मोठमोठे खुलासे झाले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. या आरोपपत्रामध्ये साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक पुराव्यांचा समावेश असेल. खंडणीचा मुख्य सूत्रधार कोण? याची देखील माहिती लवकरच समोर येईल.
तसेच आरोपींना पळून जाण्यासाठी मदत कोणी आणि का केली? याचाही तपास सीआयडीने केल्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा उल्लेख या आरोपपत्रामध्ये करण्यात आला आहे का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
CID charge sheet to be filed today
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) पोलिसांना गुंगारा देत आहे. त्याला पोलिसांनी दोन वेळा फरार घोषित करूनही तो सापडला नाही. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :