Pune Rape Case । स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचाराची (Rape case in Pune Bus Stand) धक्कादायक घडली आहे. यामुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या याप्रकरणातील आरोपी फरार असून पोलिसांची तब्बल 13 पथके त्याचा शोध घेत आहेत. (Crime in Pune)
दत्ता गाडे (Datta Gade) या आरोपीला पकडून देणाऱ्या 1 लाखाचं बक्षीस देखील देण्यात येणार आहे. पोलीस त्याच्या कुटुंबाची आणि मित्रपरिवाराची देखील चौकशी करत आहेत. चौकशीदरम्यान आरोपीबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे.
अत्याचार करण्यापूर्वी त्याच्या एका मैत्रिणीला सतत फोन आणि मेसेज करून त्रास देत होता. सतत आरोपी तिला भेटायला बोलावत होता. तुझ्या मैत्रिणीसोबत ओळख करून दे, तिच्याशी पॅचअप करून दे. तुझ्या मैत्रिणीशी माझी सेटींग लाव, अशी मागणी आरोपी सतत करत होता.
अनेकदा पीडितेने त्याला विरोध केला होता. तरीही तो सतत तिला फोन आणि मेसेज करून त्रास देत असल्याची माहिती आरोपीच्या मैत्रिणीनेच दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीचे लव्ह मॅरेज झाले असून त्याला एक मुलगा आहे.
Swargate Bus Crime
तरीही आरोपीची महिलांवर वाईट नजर होती, यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, दत्ता गाडे याचे गुन्हेगारीशी जुने नाते असून तो हिस्ट्रीशीटर आहे. दत्तात्रय गाडे 2019 जामिनावर बाहेर आला होता. अशातच आता त्याने दुसरा गुन्हा केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :