Ajit Pawar । 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्काराची घटना घडल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ही घटना केवळ एका व्यक्तीच्या सुरक्षिततेवरच नव्हे तर संपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर आणि कायदा-व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते.
महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. आरोपी दत्तात्रय गाडे फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत या घटनेला “क्लेशदायक, संतापदायक आणि शरमेने मान खाली घालायला लावणारी” असल्याचे सांगितले.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी घटनेची दखल घेत, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल असा विश्वास लाडक्या बहिणींना दिला आहे.
Ajit Pawar first reaction On Pune Rape case
Ajit Pawar X Post | पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आपल्या एका भगिनीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे.
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आपल्या एका भगिनीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या गुन्ह्यातील आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य असून त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही.
मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात व्यक्तिशः लक्ष घालून तपास करण्याचे, आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा गुन्हा गांभीर्याने घेतला असून पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. पोलिसांकडून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होईल, यासाठी राज्य शासन सर्व पावले उचलेल, हा विश्वास महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनी, मातांना देतो. पीडित बहिणीला न्याय, मानसिक आधार, सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना महिला व बाल विकासमंत्री तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष यांना देण्यात आल्या असल्याचे अजित पवारांनी सांगितले.
वाचा – स्वारगेट बस स्थानकामध्ये नेमकं काय-काय घडलं?
हे वाचा – स्वारगेट स्थानकातील बलात्कार प्रकरणात नवी माहिती उघड
महत्वाच्या बातम्या