Pune Rape Case । पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी नवे तपशील समोर आले आहेत. आरोपी दत्तात्रय गाडे याने स्वतःला बसचा वाहक असल्याचे भासवून तरुणीची फसवणूक केली आणि तिच्यावर अत्याचार केला. या घटनेविषयी बसच्या मूळ ड्रायव्हरने पोलिसांना दिलेल्या जबाबात ही माहिती दिल्याची माहिती आहे.
मंगळवारी पहाटे ३.४० वाजता एसटी बस (एच ०६ बीडब्ल्यू ०३१९) स्वारगेट बस स्थानकात दाखल झाली होती. सकाळी ६ वाजताच्या सुमारास आरोपीने फलटणला जाणाऱ्या तरुणीला स्वतःला बसचा ड्रायव्हर असल्याचे सांगितले. त्याने विश्वास संपादन करून तिला बसमध्ये बसवले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. महत्त्वाचे म्हणजे, त्या बसमध्ये कोणताही अधिकृत वाहक नव्हता, त्यामुळे आरोपीने संधीचा गैरफायदा घेत पीडितेची फसवणूक केली.
आरोपी अद्याप फरार, पोलिसांचा शोध सुरू
सध्या दत्तात्रय गाडे हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी आठ विशेष तपास पथके नेमण्यात आली आहेत. या घटनेने पुणे शहर हादरले असून महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, स्वारगेट डेपोमधील 23 सुरक्षा रक्षक यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच नवीन सुरक्षा रक्षक नेमणुकीचे आदेश परिवहन मंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. तर स्वारगेट डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रक यांची चौकशी करून एका आठवड्यात चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश मंत्र्यांनी दिला आहे.
वाचा – स्वारगेट बस स्थानकामध्ये नेमकं काय-काय घडलं?
महत्वाच्या बातम्या