Share

Ajit Pawar यांची डोकेदुखी ठरलेला आमदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

Ajit Pawar यांची डोकेदुखी ठरलेले आमदार Sharad Sonawane एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार

Published On: 

Ajit Pawar held DPDC meeting without eknath shinde group mla in Raigad

🕒 1 min read

पुणे ।  अजित पवार ( Ajit Pawar ) यांची डोकेदुखी ठरलेला जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे ( Sharad Sonawane ) पुन्हा एकदा शिवसेनेत सामील होणार आहेत. २८ फेब्रुवारी रोजी नारायणगाव येथे होणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या उपस्थितीत ते अधिकृतरीत्या पक्षात प्रवेश करतील.

शरद सोनवणे यांनी जुन्नर विधानसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार अतुल बेनके यांचा पराभव केला होता. हा विजय राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटासाठी ( Ajit Pawar Group ) मोठा धक्का ठरला.

Sharad Sonawane to join Eknath Shinde Shiv Sena

पूर्वी महायुतीचा भाग असतानाही, शरद सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे सोनवणे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, आता ते पुन्हा शिवसेनेत ( शिंदे गटात) सामील होत आहेत.

शिवाजी आढळराव पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेतुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( Ajit Pawar Group ) प्रवेश केला आणि अजित पवार गटाकडून लोकसभेचे तिकीट मिळवले. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यांच्या पक्षबदलामुळे शिरूर मतदारसंघात शिवसेनेचे नेतृत्व नव्हते. आता शरद सोनवणे शिवसेनेत परतल्यामुळे, शिरूर मतदारसंघातील नेतृत्वाची जबाबदारी ते स्वीकारतील का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या पुनर्प्रवेशामुळे जुन्नर आणि शिरूर मतदारसंघातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)