Share

AFG vs ENG | अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड महत्त्वाच्या लढतीसाठी सज्ज

Icc champions trophy 2025 afg vs eng

AFG vs ENG | आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील आठवा सामना बी ग्रुपमधील अफगाणिस्तान आणि इंग्लंड संघांमध्ये लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल, तर टॉस दुपारी 2 वाजता पार पडला. अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहीदी याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघांसमोर ‘करो या मरो’ची परिस्थिती

हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. इंग्लंड आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांना त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे, या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. एका संघाला स्पर्धेतून गारद होण्याची वेळ येऊ शकते, तर दुसऱ्या संघाला पुढील फेरीसाठी आशा कायम ठेवण्याची संधी मिळेल.

या लढतीत प्रचंड चुरस आणि उत्कंठा पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ आपले आव्हान टिकवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. या सामन्याचा निकाल दोन्ही संघांच्या स्पर्धेतील भविष्यावर महत्त्वपूर्ण परिणाम करणार आहे.

ICC Champions Trophy 2025 AFG vs ENG

England Playing XI

जोस बटलर (कर्णधार), फिलिप सॉल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जोफ्रा आर्चर, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद आणि मार्क वुड.

Afghanistan Playing XI

हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, सेदिकुल्ला अटल, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, रशीद खान, नूर अहमद आणि फजलहक फारुकी.

ENG vs AFG Live Streaming

ENG Vs AFG सामना तुम्ही टीव्ही वर Sports 18 नेटवर्कवर पाहू शकता. स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि स्मार्टफोन बघायचे असल्यास तुम्ही JioHotsatr अॅपवर Live Streaming पाहू शकता.

महत्वाच्या बातम्या

ICC Champions Trophy 2025 afg vs eng afghanistan won toss and elected to bat against england at lahore a do or die match for both teams |

Cricket India Marathi News Sports

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या