Share

Pune Crime : स्वारगेट एसटी स्टँडवर तरुणीवर बलात्कार; आरोपीचा शोध सुरू

Rape on girl in Shivshahi Bus at pune swarget st depo | Pune Shivshahi Bus rape case details swarget st depo police gave important informaton how crime happened

Published On: 

Pune Crime | Pune Rape case at pune swarget st depo

🕒 1 min read

Pune Crime : पुण्यात स्वारगेट एसटी स्थानकावर एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सोमवारी पहाटे ही घटना घडली असून, पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी बसस्थानकावर आली होती. यावेळी, एका अज्ञात व्यक्तीने तिच्याशी संवाद साधून बस दाखवण्याच्या बहाण्याने तिला शिवशाही बसमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.

Pune Crime | Shivshahi Bus rape case details 

पीडित तरुणी स्वारगेट स्थानकावर फलटण बससाठी थांबली असताना आरोपी तिच्याशी गोड बोलून ओळख वाढवू लागला. त्याने तिला दिशाभूल करत सांगितले की, सातारची बस येथे थांबत नाही. मात्र, तरुणीने त्याला विरोध करत सांगितले की, ती इथेच थांबते. यानंतर आरोपीने तिला एका शिवशाही बसमध्ये जाण्यास प्रवृत्त केले.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये तरुणी आरोपीसोबत बसकडे जात असल्याचे स्पष्ट दिसते. बसमध्ये अंधार असल्याने तिने शंका व्यक्त केली, मात्र आरोपीने तिला प्रवासी झोपले असल्याचे सांगितले. बसमध्ये पाऊल टाकताच, आरोपीने मागील दरवाजा बंद केला आणि तिच्यावर अत्याचार केला.

पोलिसांची तातडीची कारवाई

गुन्हा केल्यानंतर आरोपी तिथून पसार झाला, तर काही वेळाने तिने तिच्या मित्राला फोन करून घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. मित्राच्या सल्ल्यानुसार, तिने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आरोपीचा शोध सुरू

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटली आहे. तो शिरूर गावचा असून, त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३९२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पकडण्यासाठी आठ पोलीस पथके शोध घेत आहेत. तसेच, या घटनेमुळे पुण्यातील सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षेच्या व्यवस्थेवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या