Share

Pune : “शरीरसुखाची मागणी पूर्ण न केल्यानं निलंबित केलं…”, PMPL महिला कंडक्टरचा कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न

PMPL महिला कंडक्टरने आरोप केला आहे की, कुसाळकर यांनी तिच्यासोबत अयोग्य वर्तन केले आणि शारीरिक सुखाची मागणी केली. तिच्या नकारानंतर तिला निलंबित करण्यात आले.

Pune News : पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPL) मध्ये कार्यरत एका महिला बस कंडक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डेप्युटी चीफ मॅनेजर संजय कुसाळकर यांच्या कार्यालयात हा प्रकार घडला. संबंधित महिलेने आरोप केला आहे की, कुसाळकर यांनी तिच्यासोबत अयोग्य वर्तन केले आणि शारीरिक सुखाची मागणी केली. तिच्या नकारानंतर तिला निलंबित करण्यात आले, ज्यामुळे तणावग्रस्त होऊन तिने हा टोकाचा निर्णय घेतला.

PMPL महिला कंडक्टरने आत्मदहनाचा प्रयत्न; वरिष्ठ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

महिलेने संतापाच्या भरात कुसाळकर यांच्या केबिनमध्ये स्वतःवर ज्वलनशील पदार्थ ओतून घेतले. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून तिला थांबवले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे PMPL कार्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, महिलेच्या आरोपांवर अधिकृत कारवाई केली जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

PMPL महिला कंडक्टरने आरोप केला आहे की, कुसाळकर यांनी तिच्यासोबत अयोग्य वर्तन केले आणि शारीरिक सुखाची मागणी केली. तिच्या नकारानंतर तिला निलंबित करण्यात आले.

Pune Crime

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या