Share

Santosh Deshmukh Murder Case : उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती

Ujjwal Nikam appointed as special govt advocate in santosh deshmukh murder case

Published On: 

Ujjwal Nikam appointed as special govt advocate in santosh deshmukh murder case

मुंबई ।  महाराष्ट्रातील संतोष देशमुख हत्याप्रकरणात ( Santosh Deshmukh Murder Case ) महत्त्वपूर्ण घडामोड झाली असून, या प्रकरणाच्या न्यायालयीन लढतीसाठी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, बाळासाहेब कोल्हे यांना सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी निकम यांना नियुक्त करण्याची मागणी केली होती, जी आता मान्य करण्यात आली आहे.

या प्रकरणातील न्यायाच्या मागणीसाठी मस्साजोग गावातील ग्रामस्थांनी सात मागण्यांसह अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून, आज त्याचा दुसरा दिवस आहे. आंदोलनातील प्रमुख मागण्यांपैकी एक असलेली उज्ज्वल निकम यांची नियुक्ती सरकारने स्वीकारली आहे. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आणि धनंजय देशमुख यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Ujjwal Nikam appointed in Santosh Deshmukh murder case

दरम्यान, अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी संतोष देशमुख यांच्या आई शारदाबाई देशमुख आणि त्यांच्या नातेवाईकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. धनंजय देशमुख यांनी कालपासून पाणीही घेतले नाही, त्यांचा रक्तदाब सामान्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

केज पोलीस ठाण्याचे निरीक्षक वैभव पाटील यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा निरोप दिला की, मागण्यांवर सकारात्मक पावले उचलली जात आहेत आणि त्यामुळे आंदोलन स्थगित करावे. या घटनाक्रमामुळे प्रकरणाला वेग आला असून, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते न्याय मिळेपर्यंत संघर्ष करण्याच्या भूमिकेत आहेत.

ग्रामस्थांच्या सात प्रमुख मागण्या:

  1. केजचे तत्कालीन PI प्रशांत महाजन आणि PSI राजेश पाटील यांना सेवेतून बडतर्फ करून सहआरोपी करावे.
  2. फरार आरोपी कृष्णा आंधळे याला लवकरात लवकर अटक करावी.
  3. सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी.
  4. हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा.
  5. वाशी पोलीस ठाण्याचे अधिकारी घुले, दिलीप गित्ते, गोरख आणि दत्ता बिकड , हेड कॉन्सेटबल यांचे कॉल डिटेल्सची (CDR) तपासणी करून त्यांना सहआरोपी करावे.
  6. आरोपींना मदत करणाऱ्या संभाजी वायबसे दांपत्य, बालाजी तांदळे, संजय केदार, सारंग आंधळे व्यक्तींची चौकशी करून त्यांना गुन्ह्यात सहभागी करावे.
  7. संतोष देशमुख यांचा मृतदेह केज रुग्णालयात नेण्याऐवजी कळंबच्या दिशेने वळवण्यामागील कारणांची चौकशी करावी.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही