Share

Sandipan Bhumare यांच्या OSD ने लाच मागितली; Amol mitkari यांचा गंभीर आरोप

Amol Mitkari makes serious allegations on Sandipan Bhumare OSD । Sandipan Bhumare’s OSD demanded bribe, Mitkari makes serious allegations । आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या OSD वर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.

Published On: 

Amol Mitkari makes serious allegations on Sandipan Bhumare OSD

🕒 1 min read

अकोला : महाराष्ट्रात मंत्र्यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचार आणि दलाली रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्र्यांचे व्यक्तिगत सहाय्यक (ओएसडी) आणि इतर अधिकाऱ्यांच्या नेमणुकीवर आता मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण असणार आहे. मंत्र्यांच्या ओएसडी आणि सहाय्यक नेमण्याचा अधिकार केवळ मुख्यमंत्र्यांकडेच असेल, अशी ठाम भूमिका देवेन्द्र फडणवीसांनी घेतली आहे. कोणत्याही भ्रष्ट किंवा आरोप असलेल्या व्यक्तींना या पदांवर नियुक्त करण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे फडणवीसांनी सांगितले.

Amol mitkari यांचा तत्कालीन मंत्री भुमरेंच्या OSD वर गंभीर आरोप

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या OSD वर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. शिवसेनेच्या एका मंत्र्यांच्या ओएसडींकडून 5 कोटींच्या कामासाठी 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे.  तत्कालीन मंत्री संदीपान भुमरेंच्या ओएसडीकडून मला तसाच अनुभव आल्याचा गंभीर आरोप मिटकरींनी केला आहे. मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांच्या या कठोर भूमिकेचे समर्थन करत भ्रष्टाचार रोखण्यासाठी हे पाऊल आवश्यक असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांच्या कार्यालयातील पीए, पीएस आणि ओएसडी यांच्या कामकाजावर सतत नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जर कोणताही अधिकारी भ्रष्टाचारात गुंतलेला आढळला, तर त्याला तातडीने पदावरून हटवले जाणार असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.

Devendra Fadnavis यांनी माणिकराव कोकाटेंना खडसावले

माणिकराव कोकाटेंना कदाचित हे माहीत नाही की मंत्र्यांचे पीए, ओएसडी नेमण्याचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांनाच असतात. मंत्र्यांनी नावाचा प्रस्ताव पाठवायचा असतो. कुणाला राग आला तरी चालेल, पण ज्यांच्यावर आरोप आहेत, अशा ‘फिक्सर लोकांच्या नावाला मंजुरी देणार नाही, अशा कडक शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटेंना खडसावले आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Politics Crime Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या