Share

पाकिस्तान हायअलर्ट। Champions Trophy वर दहशतवादी संकट; परदेशी नागरिक हिटलिस्टवर 

Pakistan’s security forces are on high alert due to an intelligence warning of a potential abduction plot against foreign guests at the ICC Champions Trophy 2025.

Published On: 

ICC Champions Trophy 2025.

दिल्ली । पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट ( ICC Champions Trophy 2025 ) स्पर्धेला दहशतवादी धमकीचा सामना करावा लागत आहे. या स्पर्धेसाठी जगभरातील क्रिकेटप्रेमी आणि परदेशी नागरिक पाकिस्तानमध्ये दाखल होत आहेत, मात्र त्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर बातमी समोर आली आहे.

पाकिस्तानी गुप्तहेर संस्था (इंटेलिजन्स ब्युरो) यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामिक स्टेट खोरासन प्रोव्हिन्स (ISKP) या दहशतवादी संघटनेकडून परदेशी नागरिकांना लक्ष्य करण्याचा कट रचला जात आहे. विशेषतः चीन आणि अरब देशांतील नागरिकांचे अपहरण करून खंडणी वसूल करण्याची योजना आखल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Pakistan intel on ’high alert’

या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आहे. गुप्तहेर संस्थेच्या अहवालानुसार, दहशतवादी गटाने विमानतळ, बंदरे, सरकारी कार्यालये आणि निवासी भागांवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत मोठी कडेकोट वाढ करण्यात आली आहे.

भारताचे Champions Trophy सामने पाकिस्तानबाहेरच

भारताने पाकिस्तानमध्ये सामना खेळण्यास नकार दिला असल्याने भारताचे सामने पाकिस्तानबाहेरच खेळवले जात आहेत. स्पर्धेसाठी आलेल्या परदेशी नागरिकांसाठी पाकिस्तानमध्ये सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. ISKP कडून मिळालेल्या धमक्यांमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीवर भीतीचे सावट निर्माण झाले असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही