…तर तुम्ही 144 लावा नाही तर 145 लावा; Manoj Jarange यांचा फडणवीसांना इशारा

Maratha reservation protestor Manoj Jarange Patil once again warned Devendra Fadnavis government

Published On: 

Maratha reservation protestor Manoj Jarange Patil once again warned Devendra Fadnavis government

Manoj Jarange ।  बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांच्या अपहरणानंतर हत्येच्या घटनेने राज्यात खळबळ उडवली आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला तरीही आरोपींना अद्याप शिक्षा झालेली नाही. या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार असून, न्याय मिळावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे ( Manoj Jarange ) पाटील यांनी मस्साजोगला भेट देऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सरकारला इशारा दिला की, “उपोषण करणाऱ्यांच्या जीवाला काही झाले तर जबाबदार सरकार असेल. गावकऱ्यांवर ही जबाबदारी टाकता येणार नाही. सरकारने लोकशाहीचा गळा घोटू नये. हत्या झाली असूनही मुख्य आरोपी फरार आहे, मग कोणावर कारवाई केली?”

Manoj Jarange again warned Devendra Fadnavis gov

जरांगे पाटील यांनी सरकारच्या आश्वासनांवरही टीका करत म्हटले, “सरकारने योग्य वेळी कारवाई केली असती, तर आज हे आंदोलन करण्याची वेळ आली नसती. देशमुख कुटुंबाला न्यायासाठी संघर्ष करावा लागतोय, ही लाजिरवाणी बाब आहे.”

तुम्ही 144 लावा नाहीतर 145 लावा, तुमच्या हातात सत्ता आल्यावर तुम्ही लोकशाही मारून टाकली का? तुम्ही म्हणता एकालाही सोडणार नाही, तुम्ही नेमकं कोणाला धरलं? ते आधी आम्हाला सांगा, जे अटक झाले आहेत , ते स्वत:हून आले आहेत, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

याचबरोबर, त्यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जर मुख्यमंत्री दिलेली वचने पाळत असतील, तर बीड जिल्ह्याचा मोठा भाग आज जलसंपन्न असता. सरकारच्या हलगर्जीपणामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतोय,” असे ते म्हणाले.

देशमुख कुटुंबाच्या उपोषणामुळे आणि ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. न्यायाची मागणी अधिक तीव्र होत असून, सरकारवर तातडीने कारवाईचा दबाव वाढत आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही