Vicky Kaushal Chhaava Movie : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा छावा हा चित्रपट सध्या मोठ्या चर्चेत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात विकी कौशल यांनी संभाजी महाराजांची भूमिका साकारली असून, त्याचा अभिनय प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांच्या ओठांवर फक्त विकीचेच नाव आहे.
या चित्रपटाची ऑफर विकीला मिळाल्यावर त्याने कशी प्रतिक्रिया दिली, याबाबत छावा चित्रपटाचे लेखक टीमचे ओंकार महाजन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “हा आमचा विकी कौशलबरोबरचा पहिला प्रोजेक्ट होता. स्क्रिप्ट तयार झाल्यानंतर आणि विकीची कास्टिंग फायनल झाल्यानंतर आमची काही मिटिंग्स झाल्या. पहिल्या मिटिंगदरम्यान लक्ष्मण उतेकर यांनी विकीला संपूर्ण स्क्रिप्ट वाचून दाखवली.”
Vicky Kaushal Chhaava Movie
ओंकार पुढे म्हणाले, “मध्यांतरानंतर आम्ही थोडा कॉफी ब्रेक घेतला आणि नंतर उर्वरित स्क्रिप्ट वाचून दाखवली. त्या क्षणी विकीच्या डोळ्यात पाणी आले होते, अश्रू अनावर झाले असे म्हणणार नाही. तो उठून उभा राहिला आणि भावूक होत सर्वांसमोर हात जोडले आणि म्हणाला, ‘तुम्ही माझ्याकडे बोलण्यासाठी काही ठेवलंच नाही.’”
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपटात विकी कौशलसोबत रश्मिका मंदाना येसूबाई भोसले यांच्या भूमिकेत आहेत. तसेच अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि विनीत कुमार सिंग यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाच्या भव्यता आणि दमदार अभिनयामुळे तो मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
महत्वाच्या बातम्या