Brahmastra 2 । अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा’ (Brahmastra Part One: Shiva) हा चित्रपट रिलीज झाला त्यावेळी तो सुपरहिट ठरला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. प्रेक्षक आता दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
याबाबत रणबीर कपूरने माहिती दिली आहे. “ब्रह्मास्त्र हे अनेक वर्षांपासूनचं अयान मुखर्जीचे स्वप्न आहे. सध्या तो वॉर 2 (War 2) च्या दिग्दर्शनात व्यस्त असून हा चित्रपट रिलीज झाला की तो ब्रह्मास्त्र 2 च्या प्री प्रोडक्शनचे काम चालू करेल. याबाबत लवकरच घोषणा होईल,” असे रणबीर कपूर म्हणाला.
तसेच रणबीरने लव्ह अँड वॉर (Love and War) या चित्रपटाबद्दलही माहिती दिली. “संजय लीला भन्साळींसोबत काम करणे खूप खास आहे. मी त्यांच्यासारखा मेहनती माणूस कधीच पाहिला नाही. तो पात्रे, भावना, संगीत आणि भारतीय संस्कृती चांगल्या प्रकारे समजतो. त्याच्या सेटवर काम करणे थकवणारे आणि वेळखाऊ असते, परंतु एक कलाकार म्हणून ते समाधानकारक असते,” असा खुलासा रणबीरने केला.
लव्ह अँड वॉर चित्रपटामध्ये रणबीर कपूरसोबत विकी कौशल (Vicky Kaushal) देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. त्यांचा हा चित्रपट मार्च 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्यासाठी काही महिन्यांची वाट पाहावी लागणार आहे.
Ranbir Kapoor upcoming film
इतकेच नाही तर रणबीर कपूरकडे रामायण आणि अॅनिमल 2 (Animal 2) सारखे मोठे प्रोजेक्ट्स आहेत. तसेच आलिया भट्ट लवकरच अल्फा चित्रपटामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या रिलीजबद्दल बोलायचे झाले तर तो या वर्षी ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :