Share

“मी मुसलमान आणि रामायण हिंदू…”, ए.आर. रहमान यांनी असं का म्हटलं?

ए.आर. रहमान यांनी रामायण चित्रपटाबद्दल आणि आपल्या धार्मिक ओळखीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. “मी मुसलमान आहे, पण…” असं म्हणत त्यांनी सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.

Published On: 

AR Rahman Statement: "मी मुसलमान आणि रामायण हिंदू...", रहमान यांचं मोठं वक्तव्य

मुंबई – कलाकाराला खरोखरच धर्म असतो का? हा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. पण ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान (AR Rahman) यांनी यावर जे उत्तर दिलंय, त्यामुळे सध्या सर्वत्र त्यांचीच चर्चा रंगली आहे. आपल्या संगीताने जगाला भुरळ घालणारे रहमान गेल्या काही काळापासून बॉलीवूडमधील ‘राजनिती’मुळे चर्चेत होते. पण आता त्यांनी थेट ‘रामायण’ आणि त्यांच्या धार्मिक श्रद्धेवर केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतंय.

ए.आर. रहमान यांनी एका मुलाखतीत आपल्या करिअरमधील चढ-उतार आणि धार्मिक विश्वासाबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. गेल्या ८ वर्षांपासून बॉलीवूडमध्ये आपल्याला काम मिळत नव्हतं, इंडस्ट्रीमध्ये आपल्याविरुद्ध ‘राजनिती’ (Politics) खेळली जात होती, असा गौप्यस्फोट त्यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता. यामुळे सिनेवर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

AR Rahman Statement 

आता नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाबद्दल बोलताना रहमान यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. तुम्हाला रामायणासारख्या हिंदू ग्रंथावर आधारित सिनेमाला संगीत देताना धार्मिक अडचण वाटली का? या प्रश्नावर त्यांनी दिलेलं उत्तर खूप बोलकं आहे.

“मी ब्राह्मण शाळेत शिकलोय. तिथे दरवर्षी रामायण आणि महाभारताच्या कथा ऐकल्या आहेत. लोक धर्मावरून वाद घालू शकतात, पण मी फक्त चांगल्या गोष्टींना महत्त्व देतो,” असं रहमान यांनी स्पष्ट केलं.

पुढे बोलताना त्यांनी पैगंबरांच्या शिकवणीचा दाखला दिला. ते म्हणाले, “पैगंबरांनी सांगितलं आहे की ज्ञान अनमोल आहे, मग ते राजाकडून मिळो किंवा भिकाऱ्याकडून. चांगल्या गोष्टी कोठूनही घ्याव्यात. आपण संकुचित विचारांच्या पलीकडे जायला हवं.”

पुढे बोलताना रहमान यांनी एक मोठं विधान केलं. “मला या प्रोजेक्टचा अभिमान आहे. मी मुस्लीम आहे आणि रामायण हा हिंदू ग्रंथ आहे, पण कलेच्या आड धर्म येत नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

या चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी, सनी देओल आणि अरुण गोविल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यामुळे आता ए.आर. रहमान (AR Rahman) यांचं संगीत आणि ‘रामायण’ची कथा पडद्यावर काय जादू करणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install