Satish Bhosale । बीडच्या सतीश भोसले उर्फ खोक्या भाईला पोलिसांकडून उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच त्याने एका माध्यमांना मुलाखत देऊन थेट पोलिसांनाच चॅलेंज केले होते.
त्यामुळे त्याला पोलिस आणि कायद्याचा धाक आहे की नाही? असा सवाल उपस्थित होत होता. अखेर पोलिसांना त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. परंतु, सतीश भोसलेला वनविभागाकडून मोठा धक्का बसला आहे. त्याच्या घरावर बुलडोझर फिरवला जाणार आहे.
वनविभागाच्या जागेवर त्याने घर बांधले होते, त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. शिरूर कासार पासून काही अंतरावर त्याचे हे घर आहे. खोक्याला वनविभागाकडून नोटीस देण्यात आली होती. परंतु, ४८ तास होऊनही त्याने या नोटीसला उत्तर दिले नाही.
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यामधील एका व्यक्तीला शिरूर कासार तालुक्यातील बावी येथे नेऊन पाच ते सहा जणांनी अर्धनग्न करत बॅटने मारहाण केली. पोलिसांनी स्वत: तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिलीप ढाकणे (Dilip Dhakane) आणि महेश ढाकणे (Mahesh Dhakane) यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल (Satish Bhosale viral video) झाला.
Forest Department big action against Satish Bhosale
याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर लगेच वनविभागाने त्याच्या घरावर छापा मारून तपासणी केली. यामध्ये त्यांनी वाळलेले मांस आणि शिकारीचे साहित्य जप्त केले होते. आता त्याच्या घरावर बुलडोझर फिरवला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :