Share

Satish Bhosale मुळे ‘हे’ लोक येणार अडचणीत, पोलिसांनी केला फोन जप्त

by MHD
Satish Bhosale phone seized by police

Satish Bhosale । खोक्या भाई उर्फ सतीश भोसलेच्या घरावर काल वनविभागाकडून बुलडोझर फिरवण्यात आला. वनविभागाच्या जागेवर त्याने घर बांधले असल्याने त्याच्यावर ही कारवाई केली. इतकेच नाही तर भोसलेचे पाडलेले घर अज्ञातांनी पेटवून दिल्याची घटना घडली आहे. (Forest Department Action taken against Satish Bhosale)

त्याच्या घराला आग कोणी आणि कशासाठी लावली? याची माहिती अद्याप मिळाली नाही. पोलिसांनी आता त्याचा फोन जप्त केला आहे. या फोनच्या मदतीने तो झाल्यापासून कुणाच्या संपर्कात होता?, त्याला कोणी मदत केली? याची माहिती मिळेल.

त्यामुळे आता त्याला मदत करणारे लोक अडचणीत आले आहेत. सध्या सतीश भोसलेची वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आहे. आज त्याला बीडच्या शिरूर कोर्टात नेले जाणार आहे. कोर्टात त्याला काय शिक्षा मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

सतीश भोसले भाजपचा (BJP) पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली होती. त्यावर भाजपने सतीश भोसलेला 2021 सालीच पक्षातून हकालपट्टी केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. काही दिवसांपूर्वीच सतीश भोसलेने शिरुर गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.

Police register case against Satish Bhosale

त्यानंतर त्याचे अनेक कारनामे समोर आले असून पोलिसांकडून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता तपासादरम्यान सतीश भोसलेचे आणखी किती कारनामे समोर येतील? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

महत्त्वाच्या बातम्या :

The police have seized Satish Bhosale phone, adding to the difficulties of the people helping him.

Crime Maharashtra Marathi News