Sanjay Raut । ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सतत कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला टार्गेट करत असतात. यामुळे अनेकदा राजकीय वाद निर्माण होत असतो. अशातच आता पुन्हा एकदा राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे.
“तुम्ही आमच्या हक्काचे आणि स्वातंत्र्याची गळचेपी करणारा असाल तर या देशांमध्ये लोक स्वस्त बसणार नाही. धर्माच्या अफूची भांग देऊन तुम्ही आमच्या स्वातंत्र्यावरती गदा आणू शकत नाही,” असा गंभीर इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
“सरकारला वाटत असेल तुमच्या विरुद्ध कोण उभे राहू शकते? पण आम्ही सरकारच्या दडपशाही विरुद्ध ताकदीने उभे राहू. भाजपचे (BJP) स्वातंत्र्य महत्त्वाचे नाही तर देशाचे स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे,” असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
“महाराष्ट्रात होळीला मशिदी झाकून ठेवण्याची वेळ आली आहे. हा संकुचितपणा देशाला आणि धर्माला परवडणारा नाही. आमची प्रतिमा जगभरात लिबरल सहिष्णू अशी असल्याने हिंदू धर्माला जगात मान आहे,” असा दावा संजय राऊत यांनी केला.
Sanjay Raut attack on BJP
पुढे ते म्हणाले की, “आम्ही कोणालाही विरोधक समजत नाही. दिल्लीत मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani), वाजपेयी अशा प्रमुख नेत्यांच्या घरी होळी व्हायची. सर्व राजकीय पक्षाचे आणि धर्माचे लोक त्यात सहभागी व्हायचे. पण आता ही प्रथा बंद झाली आहे,” अशी खंत राऊत यांनी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या :