Delhi Capitals । इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल (IPL 2025) ही जगातील सर्वात लोकप्रिय टी-20 लीग असल्याने आयपीएलचे फक्त भारतातच नाही तर जगभरातील क्रिकेट चाहते आयपीएलची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाच्या हंगामात एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत.
आयपीएलला काही दिवसांचा अवधी असताना चाहते दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार कोण होणार? याची वाट पाहत होते. अशातच आता संघाने आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. संघाने ऑलराउंडर भारतीय खेळाडू अक्षर पटेलवर (Axar Patel) कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे.
कर्णधारपदाच्या शर्यतीत फाफ डू प्लेसिस, केएल राहुल आणि अक्षर पटेल हे खेळाडू होते. परंतु, फ्रँचायझीने अक्षर पटेलला कर्णधार म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे चाहत्यांची आतुरता संपली आहे. नवीन कर्णधाराच्या नेतृत्वात संघ यंदा विजेतेपद जिंकणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
Delhi Capitals IPL 2025 Full Schedule
24 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स
30 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
5 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
10 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
13 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
16 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
19 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स
22 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स
27 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
29 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
5 मे – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
8 मे – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज
11 मे – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स
15 मे – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
Delhi Capitals Team
अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, मिशेल स्टार्क, केएल राहुल, हॅरी ब्रूक, जेक फ्रेझर-मॅकगर्क, टी. नटराजन, करुण नायर, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, मोहित शर्मा, फाफ डू प्लेसिस, मुकेश कुमार, दर्शन नालकांडे, विप्रज निगम, दुष्मंथा चामीरा, डोनोवन फरेरा, अजय मोंडल, मनवंत कुमार, त्रिपुराण विजय, माधव तिवारी.
महत्त्वाच्या बातम्या :