Satish Bhosale । बीडमधील मारहाणी आणि इतर गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले याला अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाचा मोठा दणका बसला आहे.
सतीश भोसलेला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला सात दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी केली होती, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती. पण त्याला न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सतीश भोसलेचे वकील अंकुश कांबळे (Ankush Kamble) यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “सतीश भोसले हा एका आमदाराचा कार्यकर्ता असून तो पारधी समाजाचा असल्याने त्याच्यावर कारवाई केली आहे. सतीश भोसले जातीय राजकारणाचा बळी ठरला आहे,” असा दावा अंकुश कांबळे यांनी केला आहे.
“सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावर असलेला राग हा सतीश भोसलेवर काढला जातोय. वड्याचे तेल वांग्यावर निघाले आहे. त्याचे घर उद्धस्त केले गेले आहे. ते कुणालाही मान्य होणार नाही,” असे अंकुश कांबळे म्हणाले.
Satish Bhosale Police Custody
दरम्यान, कालच त्याच्या शिरूर कासार येथील घरावर वनविभागाने बुलडोझर फिरवण्यात आला आहे. त्याचे वनविभागाच्या जागेवर बांधलेले घर जमीनदोस्त करण्यात आले आहे. परंतु, काल अज्ञात व्यक्तींनी त्याचे पाडलेले घर पेटवून दिले.
महत्त्वाच्या बातम्या :