🕒 1 min read
Suresh Dhas । संतोष देशमुख हत्याप्रकरणी (Santosh Deshmukh murder case) दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. नुकतीच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणात सुनावणी पार पडली. आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारने पोलिसांना दिलेल्या जबाबाची माहिती समोर आली आहे.
सुग्रीव कराड (Sugriv Karad) याच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांनी सुदर्शन घुले याला मारहाण केली, असा जबाब जयराम चाटे आणि महेश केदार याने पोलिसांना दिला आहे. यावर आता भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“कोण आहे हा सुग्रीव कराड? त्याचा या प्रकरणात काहीही संबंध नाही. आकाच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांचा खून झाला, हे आरोपींनी कबुल केले आहे. संतोष देशमुख यांची इतक्या क्रूरपणे हत्या केली, अशी कोणाचीही हत्या झाली नसेल,” अशी प्रतिक्रिया धस यांनी दिली आहे.
दरम्यान, जयराम चाटे आणि महेश केदार याने कबुली जबाबात एका नवीन व्यक्तीच्या नावाचा उल्लेख केला आहे. सुग्रीव कराडने यांना मारा आणि हाकलून लावा असे सांगितल्यानंतर संतोष देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सुदर्शन घुले याला 6 डिसेंबरला आवादा कंपनीच्या परिसरात मारहाण केली होती.
Who is Sugriv Karad in Santosh Deshmukh murder case
सुग्रीव कराड हा केजचा रहिवासी असून त्याची आई केजच्या पंचायत समितीची माजी सदस्य होत्या. पत्नी नगरसेविका होत्या. त्याने आमदार धनंजय मुंडे, बजरंग सोनवणे आणि वाल्मिक कराडसाठी काम केलं आहे. केज नगरपरिषद निवडणुकीत बजरंग सोनवणेंच्या मुलीविरोधात सुग्रीव कराडची पत्नी उभ्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या :
- Prashant Koratkar कडे असणारी Rolls-Royce कार कोणाची आहे? महत्त्वाची माहिती आली समोर
- कोण आहे Sugriv Karad? ज्याने दिली होती संतोष देशमुखांच्या आरोपींची टीप
- Disha Salian मृत्यूप्रकरणात नवं कनेक्शन समोर, वकिलांनी केला खळबळजनक खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











