Disha Salian । दिशा सालियान मृत्यूप्रकरणी (Disha Salian death case) दररोज आरोप प्रत्यारोपांच्या फैरी होत आहेत. याप्रकरणी आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर सत्ताधारी सातत्याने निशाणा साधत आहेत. अशातच आज मालवणी पोलिसांचा आधीचा क्लोजर रिपोर्ट समोर आला आहे.
यामध्ये दिशा तिचे वडील सतीश सालियन (Satish Salian) यांच्या अफेअरमुळे संबंधितांना पैसा देऊन थकली होती. आर्थिक तणावातून दिशाने आत्महत्या केली, असे मालवणी पोलिसांच्या तपासानंतर क्लोजर रिपोर्टमध्ये (Closure Report) नमूद करण्यात आले आहे.
यावर आता सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “जर मुंबई पोलिसांनी तो रिपोर्ट मागे घेतला आहे, तर मग तो वैध कसा असेल? त्यातील गोष्टींना आता काही अर्थच नाही,” असा दावा ओझा यांनी केला आहे.
“याप्रकरणी एसआयटीची स्थापना झाली, नव्याने तपास सुरू झाला. या रिपोर्टचा आरोपींना बचावात काही उपयोग होणार नाही, आरोपींच्या प्रवक्त्यांना काय आनंद करायचाय असेल तो करू द्या,” असे निलेश ओझा म्हणाले.
Nilesh Ojha on Closure Report
पुढे ते म्हणाले की, “दिशाचा मित्र रोहन राय याने वर्षभरानंतर एका मुलाखतीत दिशाच्या मृत्यूबाबत खुलासा केला होता. ही 15 नोव्हेंबर 2022 रोजी वृत्तपत्रात मुलाखत छापली होती. दिशा प्राण्यांच्या समस्यांबाबत फार संवेदनशील होती, केरळमध्ये एका गरोदर हत्तीणीसोबत घडलेल्या घटनेने ती नैराश्येत होती असे यात म्हटलं होतं,” असे ओझा म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :