Share

“ही तर पिल्लं…”; रामदास कदमांची जीभ घसरली? आदित्य-अमित ठाकरेंवर आतापर्यंतची सर्वात जहरी टीका!

Shiv Sena leader Ramdas Kadam sparks controversy by referring to Aditya and Amit Thackeray as ‘kids’ (Pilla) and challenging Uddhav Thackeray regarding his 25-year tenure.

Published On: 

Ramdas Kadam targets Uddhav Thackeray due to Rajan Salvi entry into Eknath Shinde group

🕒 1 min read

मुंबई – राजकारणात टीका-टिप्पणी चालतेच, पण जेव्हा ज्येष्ठांकडून तरुणांचा उल्लेख ‘पिल्लं’ असा केला जातो, तेव्हा नक्कीच भुवया उंचावतात. वरळीत महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटला, पण चर्चा मात्र रंगलीये ती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केलेल्या एका विधानाची. भरसभेत कदम यांनी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा उल्लेख चक्क ‘पिल्लं’ असा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

वरळीच्या ‘डोम’मध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. यावेळी रामदास कदम यांनी आपल्या आक्रमक शैलीत उद्धव ठाकरेंना थेट चॅलेंज दिलं. “उद्धव ठाकरेंना माझ्यासमोर उभं करा, होऊन जाऊ द्या आमनेसामने… २५ वर्षं मुंबईकरांसाठी काय केलं ते सांगा?” असं उघड आव्हानच त्यांनी दिलं. निवडणुकीच्या तोंडावर ‘मुंबई तोडणार’ अशी ओरड करणाऱ्यांचाही त्यांनी ( Ramdas Kadam ) समाचार घेतला.

Ramdas Kadam controversial remark Aditya-Amit Thackeray

मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीवर बोलताना कदम कडाडले, “दोन काय, ५ भाऊ एकत्र आले तरी मराठी माणूस तुम्हाला मत देणार नाही. एकनाथ शिंदेंनी एकच घाव घातला आणि तुम्हाला संपवलं. ‘सौ सोनार की एक लोहार की’ आहे, उद्धवजी आत्मपरीक्षण करा.” मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर मोदींचे अभिनंदन करण्याचे सौजन्यही तुम्ही दाखवले नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

माजी खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनीही आदित्य-अमित ठाकरेंची खिल्ली उडवली. “काल दोन युवराजांनी (आदित्य-अमित) उमेदवारांना दिलेलं प्रेझेंटेशन म्हणजे ‘म्युच्युअल फंड’चं प्रेझेंटेशन होतं. ज्यांच्या हातात काहीच नाही, त्यांना मुंबईकर मतदान करणार नाहीत,” असा खोचक टोला शेवाळेंनी लगावला. वरळीच्या या सभेने एक गोष्ट स्पष्ट केलीये, ती म्हणजे आगामी लढाई आता ‘वैयक्तिक पातळीवर’ लढली जाणार!

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही