Share

“राज ठाकरेंचं अस्तित्व संपणार…”; शहाजीबापूंचं ‘ते’ भाकीत आणि उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप!

Shahajibapu Patil claims Uddhav Thackeray will use Raj Thackeray, leading to his downfall

Published On: 

Shahajibapu Patil claims Uddhav Thackeray will use Raj Thackeray, leading to his downfall, and fiercely challenges Sanjay Raut ahead of the Mumbai campaign.

सोलापूर – राजकारणात मैत्री आणि दुश्मनी कधीच कायम नसते, पण जेव्हा दोन भाऊ एकत्र येतात तेव्हा तिसऱ्याला पोटशूळ उठतोच, असं म्हणतात. ठाकरे बंधूंच्या युतीवर आता शिंदे गटाच्या ‘तोफखान्या’ने, अर्थात शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी पहिलंच मोठं भाकीत वर्तवलं आहे. “उद्धव ठाकरेंच्या नादाला लागून राज ठाकरे स्वतःचं नुकसान करून घेत आहेत,” असा दावा करत बापूंनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

Shahajibapu Patil on Raj Thackeray

शहाजीबापू पाटील हे त्यांच्या रोखठोक विधानांसाठी ओळखले जातात. यावेळी त्यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राजकीय भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. “राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत जाऊन आयुष्यातली खूप मोठी चूक केली आहे. उद्धव ठाकरे राज ठाकरेंचा केवळ वापर करून घेतील आणि त्यांना निस्तेज करतील,” असं सनसनाटी विधान बापूंनी केलं आहे.

त्यांनी पुढे जाऊन असाही दावा केला की, या युतीमुळे राज ठाकरेंचं वलय आणि अस्तित्व हळूहळू संपत जाईल. एकीकडे राज ठाकरेंच्या सभांना गर्दी जमते, पण दुसरीकडे शहाजीबापूंनी त्यांना ‘संपणार’ असं म्हटल्याने मनसैनिक चांगलेच आक्रमक होण्याची शक्यता आहे.

शहाजीबापूंनी फक्त राज ठाकरेंनाच टार्गेट केलं नाही, तर त्यांचे जुने मित्र संजय राऊत यांचाही चांगलाच समाचार घेतला. महायुतीच्या प्रचारासाठी आपण लवकरच मुंबईत येणार असल्याचं बापूंनी जाहीर केलं. यावेळी बोलताना, “मी मुंबईत प्रचाराला येणार आणि संजय राऊतांसारख्याला तर कस्पटासारखा उडवून लावणार,” अशा शब्दांत त्यांनी राऊतांना ओपन चॅलेंज दिलंय.

बापूंच्या या ‘डॅशिंग’ अवतारामुळे मुंबईतल्या प्रचारात चांगलीच रंगत येणार हे नक्की. आता बापूंच्या या टीकेला ठाकरे बंधू आणि संजय राऊत कसं उत्तर देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install