🕒 1 min read
Santosh Deshmukh । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला (Santosh Deshmukh murder case) चार महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. नुकतीच या प्रकरणाची दुसरी सुनावणी पार पडली आहे. दररोज याप्रकरणाची नवनवीन अपडेट समोर येत आहे.
आरोपी महेश केदार याने त्याच्या फोनमध्ये देशमुखांना मारहाण करताना असतानाचे तब्बल 15 व्हिडिओ आणि 8 फोटो काढले होते. या सर्व गोष्टी पोलिसांनी रिकव्हर केल्या असून हे व्हिडिओ समोर आले आहेत.
देशमुख यांना दुपारी 3 वाजून 46 मिनिटांनी मारहाणीला सुरुवात केल्याचा पहिला व्हिडिओ आहे, तर शेवटचा व्हिडिओ 5 वाजून 53 मिनिटांचा आहे. मारहाण करत असताना वेळी प्रतीक घुले संतोष देशमुखांच्या छातीवर उडी मारत आहे.
यावेळी देशमुखांना रक्ताची उलटी झाली. पहिल्या व्हिडिओमध्ये देशमुख यांना पांढऱ्या रंगाच्या पाईप, वायर सारख्या हत्याराने आणि लाथा बुक्क्याने मारहाण केली जात आहे. दुसऱ्या व्हिडीओत देखील त्यांना त्याच हत्याराने मारहाण करत त्यांची पॅन्ट काढताना पाहायला मिळत आहे.
तिसऱ्या व्हिडिओमध्ये देशमुखांना वायरसारख्या मूठ लावलेल्या हत्याराने मारहाण करण्यात येत आहे. चौथ्या व्हिडिओमध्ये प्लॅस्टिकच्या लवचिक पाईपने त्यांना आरोपी मारहाण करत असून यात सुदर्शन घुलेची (Sudarshan Ghule) गाडी दिसत आहे.
पाचव्या व्हिडिओमध्ये देशमुखांना कॉलरला धरुन बसवले जात असून सहाव्या व्हिडिओमध्ये देशमुखांच्या तोंडावर मारहाणीच्या खुणा दिसत आहेत. सातव्या व्हिडीओत देशमुखांना तपकिरी रंगाच्या पाईपने मारहाण केली जात आहे. आठव्या व्हिडिओमध्ये देशमुखांना जबरदस्तीने काहीतरी विचारले जात आहे.
नवव्या व्हिडिओमध्ये देशमुखांना खाली पाडून सुदर्शन घुले सगळ्यांचा बाप आहे, असे बोलण्यास भाग पाडून त्यांच्या तोंडावर लघवी केली जात आहे. दहाव्या व्हिडिओमध्ये देशमुखांच्या अंगावरील सर्व कपडे काढल्याचे पाहायला मिळत आहे.
अकराव्या व्हिडिओमध्ये देशमुखांना अंडरवेअरवर बसवले आहे. बाराव्या व्हिडिओमध्ये त्यांचे केस ओढत पुन्हा त्यांना मारहाण केली जाते. तेराव्या व्हिडिओमध्ये देशमुखांना काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओजवळ झोपवले असून त्यांना रक्ताचे डाग असणारी पँट घातली जात आहे.
Santosh Deshmukh Video
चौदाव्या व्हिडिओमध्ये देशमुख यांना एक व्यक्ती शर्ट घालत असून यावेळी त्यांच्या अंगावरील रक्ताने माखलेले बनियन बाजूला फेकून दिले जाते. शेवटच्या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांचा व्हिवळतानाचा आवाज येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Disha Salian च्या क्लोजर रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती समोर, प्रकरणाला मिळालं वेगळं वळण
- दमदार फीचरसह Poco F7 Series लाँच, जाणून घ्या किंमत
- Shreyas Talpade ला अटक होण्याची शक्यता? फसवणुकीचा गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now