Disha Salian । दिशा सालियन मृत्यू प्रकरण (Disha Salian death case) पाच वर्षानंतर चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून सतीश सालियन (Satish Salian) यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. तसेच त्यांनी आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत.
यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अशातच आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली, असा आरोप तिचे वडील सतीश सालियान सतत करत होते. पण एक वेगळीच माहिती समोर आली आहे.
मालवणी पोलिसांचा यापूर्वीचा दिशा सालियान मृत्यूप्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट (Closure Report) समोर आला असून यात अतिशय धक्कादायक खुलासे केले आहेत. यात दिशा सालियानने आत्महत्या केली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
क्लोजर रिपोर्टनुसार, दिशा ही आर्थिक विवंचनेत होती. धक्कादायक बाब म्हणजे सतीश सालियान यांचे विवाहबाह्य संबंध होते आणि सतत ते एका महिलेला पैसे देत होते. दिशाचे वडील तिच्याकडे सतत पैशांची मागणी करत असायचे.
Malvani Police Closure Report
याबाबत तिच्या मित्रांनादेखील माहिती आहे. यामुळे सतीश सालियान यांच्या अडचणी वाढू शकता. मालवणी पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट समोर येताच आता या प्रकरणाची दिशा बदलून गेल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :