Sugriv Karad । संतोष देशमुख हत्याप्रकरणात (Santosh Deshmukh murder case) आतापर्यंत अनेक खुलासे समोर आले आहेत. नुकतीच याप्रकरणाची दुसरी सुनावणी पार पडली. यावेळी देशमुखांच्या हत्येची आरोपी सुदर्शन घुले (Sudarshan Ghule), जयराम चाटे आणि महेश केदार यांनी कबुली दिली.
तसेच आरोपी महेश केदारने देशमुखांना मारहाण करताना तब्बल 15 व्हिडिओ आणि 8 फोटो काढले होते. हेदेखील पोलिसांनी रिकव्हर केले आहे. अशातच आता याप्रकरणी सुग्रीव कराड हे नाव सध्या चर्चेत आले आहे.
जयराम चाटे आणि महेश केदार याने कबुली जबाबात एका नवीन व्यक्तीच्या नावाचा उल्लेख केला आहे. सुग्रीव कराडने यांना मारा आणि हाकलून लावा असे सांगितल्यानंतर संतोष देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सुदर्शन घुले याला 6 डिसेंबरला आवादा कंपनीच्या परिसरात मारहाण केली होती.
याचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. त्यामुळे वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि सुदर्शन घुले याची बदनामी झाली होती. अपमानाचा बदला घेण्यासाठी देशमुखांना मारहाण केली. पण त्यांच्या कबुली जबाबात खंडणीचा उल्लेख नाही.
सुग्रीव कराड हा केजचा रहिवासी असून त्याची आई केजच्या पंचायत समितीची माजी सदस्य होत्या. पत्नी नगरसेविका होत्या. त्याने आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde), बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) आणि वाल्मिक कराडसाठी काम केलं आहे. केज नगरपरिषद निवडणुकीत बजरंग सोनवणेंच्या मुलीविरोधात सुग्रीव कराडची पत्नी उभ्या होत्या.
Who is Sugriv Karad?
धक्कादायक बाब म्हणजे सुग्रीव कराडवर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून यात महिलेवर अत्याचार आणि गर्भपात, अॅट्रॉसिटी, विनयभंग यांचा समावेश आहे. आरोपी पकडून देण्यासाठी सुग्रीव कराडनं SIT ला मदत केली. यामध्ये डॉ. संभाजी वायभसे आणि पत्नी सुरेखा वायभसेला ताब्यात घेतले तर आरोपींची माहिती मिळेल, अशी टीप SIT ला सुग्रीव कराडने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले