Satish Bhosale । सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले (Khokya Bhosale) याला प्रयागराज येथून अटक केल्यानंतर वनविभागाने त्याच्या घरावर बुलडोजर फिरवला. अशातच आता त्याची पत्नी तेजू भोसले (Teju Bhosale) या बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत.
अशातच आता सतीश भोसले याच्या अडचणी वाढू शकतात. कारण आता बीडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. हरणाची शिकार केल्याच्या आरोपावरून वन्यजीव प्रेमींकडून सतीश भोसले विरोधात मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) उपोषण केले जाणार आहे.
सतीश भोसले याच्यावर मकोका अतंर्गत कारवाई केली जावी, अशी मागणी वन्यजीव प्रेमींनी केली आहे. याबाबत वन्यमित्र माऊली शिरसाट यांनी माहिती दिली आहे. “आम्ही सकाळी दहा वाजता मुंबईमधील आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहे. बाकीचे आरोपी अटक झाले पाहिजेत. या प्रकरणात एसआयटी लागावी आणि वन्यजीवांचे मांस खाणाऱ्या गुन्हेगारांचं ब्लड सॅम्पल तपासले जावे,” अशी मागणी माऊली शिरसाट (Mauli Shirsat) यांनी केली आहे.
“जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत, तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही. यापूर्वी त्यांनी मारहाणीची घटना केली नव्हती. पण दबाव होता,” असा गंभीर आरोप माऊली शिरसाट यांनी केला आहे.
Hunger strike against Satish Bhosle will be held tomorrow
दरम्यान, सतीश भोसलेच्या अडचणीमध्ये आता आणखी वाढ झाली आहे. त्यापूर्वीच त्याच्यावर विविध गुन्हे दाखल केले आहेत. अशातच आता त्याच्याविरोधात मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण केले जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :