Santosh Deshmukh । संतोष देशमुख हत्याप्रकरणी (Santosh Deshmukh murder case) सातत्याने नवनवीन अपडेट समोर येत आहे. यामुळे प्रकरणाला वेगळे वळण लागत आहे. अशातच आता याप्रकरणी अवादा कंपनीच्या वॉचमननी एक मोठा खुलासा केला आहे.
अवादा कंपनीमध्ये अशोक सोनवणे, अमरदीप सोनवणे आणि भैय्यासाहेब सोनवणे हे वॉचमन म्हणून कार्यरत होते. ड्युटीवर असताना आरोपी सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याने त्याच्या साथीदारासह आवादा एनर्जी प्रकल्पावर येऊन या वॉचमनना मारहाण केली होती.
इतकेच नाही तर त्यांना जातीवाचक शिवीगाळ देखील केली होती. यामुळे घुले आणि त्याच्या साथीदारांवर या प्रकरणात ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा नोंद केला आहे. या कंपनीच्या प्रकल्पाचे मॅनेजर शिवाजी थोपटे यांना वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) गँगमधील सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदाराने याच वॉचमन समोर खंडणी मागितली होती.
थोपटे यांनी खंडणी देण्यास नकार दिल्याने त्यांना कंपनी बंद करा, अशी धमकी दिली होती. याची माहिती मिळाल्यानंतर संतोष देशमुख हे त्या ठिकाणी भांडण सोडवण्यासाठी गेले होते. त्यांनी आरोपींकडे कंपनी बंद करू नका, अशी विनंती केली होती.
Avada Company watchman statement
यावेळी सुदर्शन घुलेने संतोष देशमुख यांना सरपंच तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती, असे या वॉचमननी आपल्या जबाबात सांगितले आहे. वॉचमनच्या जबाबामुळे वाल्मिक कराड, सुदर्शन घुले याच्यासह त्याच्या साथीदारांच्या अडचणीत भर पडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :