Mumbai Indians । मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) 2025 च्या आयपीएलमध्ये पहिल्या सामन्याकरिता बॅन करण्यात आले आहे. स्लो ओव्हर रेटमुळे हार्दिक पांड्याला मोठा धक्का बसला आहे.
त्यामुळे पहिल्या सामन्यामध्ये मुंबईचं नेतृत्व कोण करणार? असा सवाल चाहत्यांना पडला होता. आता पहिल्या सामन्याकरिता सूर्यकुमार यादव मुंबईचं नेतृत्व करणार करताना दिसणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात मुंबई पहिला सामना जिंकणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांचा पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्याच्या तिकिटांची विक्री सुरू झाली असून तुम्ही तिकिट chennaisuperkings.com आणि district.in वर खरेदी करू शकता.
किमतीचा विचार केला तर तिकिटांचे दर 1700 ते 7500 रुपयांपर्यंत ठेवले आहेत. तसेच चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांना सामना सुरू होण्याच्या 6 तास आधीपर्यंत तिकिटे ट्रान्सफर करता येणार आहे. समजा तुम्ही तिकीट बुक केले असेल, तर तुम्ही तिकीट दुसऱ्याला देऊ शकता.
Mumbai Indians Squad For IPL 2025
सूर्यकुमार यादव (कर्णधार), रोहित शर्मा, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, नमन धीर, रॉबिन मिन्झ, कर्ण शर्मा, दीपक चाहर, विल जॅक्स, मुजीब उर रहमान, मिचेल सँटेनर, रायन रिकल्टन, लिझाड विल्यम्स, रिस टोप्ली, विग्नेश पुथुर, अर्जुन तेंडुलकर, बेवन जॉन जेकॉब्स, वेंकट सत्यनारायण पेन्मेत्सा, राज अंगद बावा, श्रीजिथ कृष्णा, अश्विनी कुमार.
महत्त्वाच्या बातम्या :