Santosh Deshmukh । केज तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला (Santosh Deshmukh murder case) तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी पूर्ण झाला आहे. तरीही देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. काही दिवसांपूर्वी देशमुखांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते.
हे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. अशातच आता संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांबाबत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी मोठा दावा केला आहे.
“कधीच संतोष देशमुख यांचे सगळे मारेकरी सापडणार नाहीत आणि त्यांना शिक्षा देखील होणार नाही, असे मी यापूर्वीही सांगितले आहे. देशमुखांचा एक आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे,” असे भास्कर जाधव म्हणाले.
“संतोष देशमुख हत्या प्रकरणात विविध चौकशा लावून आरोपींना संरक्षण दिले जात आहे. दूसरा कोणी आरोपी असेल, तर त्याच्या घराची तोडफोड केली जाते. त्याच्या घरावर बुलडोजर फिरवला जातो,” असे जाधव यांनी स्पष्ट केले.
Bhaskar Jadhav statement on Santosh Deshmukh murder case
ते पुढे म्हणाले की, “वाल्मिक कराडसह (Walmik Karad) अटकेत असलेले आणि फरार असलेल्या आरोपीच्या मालमत्तेवर अजूनही कारवाई करण्यात आली नाही. म्हणजेच संतोष देशमुखांची हत्या सरकार आणि प्रशासनासाठी फार मोठी घटना आहे, असे मला वाटत नाही,” असा आरोप भास्कर जाधव यांनी केला. दरम्यान, भास्कर जाधव यांनी केलेल्या दाव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. खरोखरच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणार नाही का? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले