🕒 1 min read
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज तीन वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कोकणातील आमदार भास्कर जाधव यांनी त्या काळातील अनेक महत्त्वाचे प्रसंग उलगडले. “मी बंडात नव्हतो, ‘नॉट रिचेबल’ असल्याच्या बातम्या खोट्या होत्या,” असा खुलासा त्यांनी केला.
भास्कर जाधव म्हणाले, “२० जूनला विधानपरिषदेचं मतदान झाल्यावर मी माझ्या मतदारसंघात रेल्वेने निघून गेलो होतो. रेल्वेत झोपलो होतो, नेटवर्क नव्हतं. फोन लागत नव्हता. स्टेशनला पोहोचल्यावर मुलगा धावत आला आणि म्हणाला, ‘बाबा, टीव्हीवर बातम्या चालू आहेत, भास्करराव नॉट रिचेबल!’ मला धक्का बसला. मी म्हटलं, सगळेच होते मतदानाला, मग हे काय?”
Bhaskar Jadhav clarifies Shinde rebellion
शिंदेंच्या बंडात सामील होणार होतो, अशी चर्चा होती. यावर उत्तर देताना जाधव म्हणाले, “मी जर नाराज असतो, तर अर्णब गोस्वामी प्रकरणात सरकारची बाजू इतक्या ठामपणे मांडली असती का? शिंदेंसोबत जायचं असतं, तर लपूनछपून नव्हे, उघडपणे गेलो असतो. आणि गेलो असतो, तर कोणी दोष दिला नसता.”
गुहागरमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांचा फोन आला. “ते म्हणाले, ताबडतोब मुंबईला ये. मी त्वरित रेल्वे पकडली. पण पनवेल ते वर्षा बंगलापर्यंत जायला दोन तास लागले. सरकारच्या यंत्रणेत अकार्यक्षमता होती. जर मला कोणी किडनॅप केलं असतं, तर?” असा संतप्त सवाल जाधव ( Bhaskar Jadhav ) यांनी उपस्थित केला.
“ज्यांनी उद्धव ठाकरेंची वाईट काळात साथ सोडली, त्यांनी विश्वासघात केला,” असं म्हणत जाधव यांनी दादा भुसे, गुलाबराव पाटील, योगेश कदम, सदा सरवणकर, दीपक केसरकर आणि उदय सामंत यांच्यावर थेट टीका केली. “उदय सामंत सगळ्यात नंतर गेला, पण तो सगळ्यात चलाख ठरला. उद्धव साहेब हॉस्पिटलमध्ये असताना हे सगळं घडलं. विरोधकांनीही अशा वेळी असं वागू नये,” असा संताप त्यांनी ( Bhaskar Jadhav ) व्यक्त केला.
उद्धव ठाकरेंना दिलेल्या पाठिंब्याबाबत बोलताना जाधव म्हणाले, “मी त्यांना दोन गोष्टी स्पष्ट सांगितल्या. तुम्ही कुठल्याही पक्षासोबत जा, मी तुमच्यासोबत आहे. पण जर तुम्ही भाजपसोबत गेला, तर मी सोबत नाही.”
त्याचवेळी जाधव यांनी खासदारांच्या खोलीत जाऊन स्पष्ट भूमिका मांडली. “ही वेळ एकत्र येण्याची आहे, नातं तोडण्याची नाही. कोणी काय भाषेत बोलतोय याची जाणीव ठेवा. जे गेलेत, त्यांना परत आणा,” अशी विनंतीही त्यांनी केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- “पवारांना सोडणं आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती” – भास्कर जाधव यांची कबुली
- भास्कर जाधव यांची नाराजी; राजकारणातून निवृत्तीच्या विचारात
- लाडकी बहिण योजना: महिलांना आता 1 लाखांचं कर्ज ‘शून्य टक्के’ व्याजदराने
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












