🕒 1 min read
मुंबई – “मी नेहमी प्रामाणिकपणे काम केलं. राजकारणात जीव झोकून दिला, तसंच समाजकारणातही. शेती, उत्सव, सामाजिक कामात मन रमवले. पण आता मन सांगू लागलंय – बस झालं, आता राजकारणातून निवृत्त व्हावं,” अशा शब्दांत भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav ) यांनी आपल्या मनातलं स्पष्ट केलं.
“वयाची सत्तरी जवळ आली आहे. वाटलं होतं, यावेळी तरी विरोधीपक्ष नेतेपद मिळेल. महाराष्ट्राला दाखवायचं होतं की खरा विरोधीपक्ष नेता कसा असतो. सत्ता कितीही बलाढ्य असली तरी तिच्या डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारण्याची ताकद असलेला नेता हवा. सत्ताधारी मला घाबरतात,” असं खंतावलेल्या सुरात ते म्हणाले.
Bhaskar Jadhav hints at retirement
त्यांनी असंही नमूद केलं की, “मला पदाची हाव नाही. पण विरोधीपक्ष नेत्याच्या भूमिकेवर माझा विश्वास आहे. सरकारला कसं वठणीवर आणायचं, कायदे कसें पाळायचे हे दाखवायचं होतं. पण सत्ताधाऱ्यांना घटना मान्य नाही.”
जाधव यांनी सत्ताधारी पक्षावर थेट आरोप करताना म्हटलं, “ते माळवणकरांचा दाखला देऊन विरोधीपक्ष नेत्याच्या नियुक्तीच्या नियमात १०% आमदारांचा मुद्दा पुढे करतात. पण मी कायदा कोळून प्यायलाय. घटना स्पष्ट सांगते ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार, त्यांचाच नेता विरोधीपक्ष नेतेपदासाठी पात्र.”
२०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश घेतलेल्या भास्कर जाधवांनी मंत्रिपद न मिळाल्याची खंतही बोलून दाखवली. “पूर्वी कॅबिनेट मंत्री होतो. शिवसेनेत आल्यावरही वाटलं की मंत्रिपद मिळेल. पण माझ्या नावाचा विचारच झाला नाही. वाईट वाटलं, पण पक्ष नेतृत्वाचा निर्णय मी मान्य केला. त्यामुळे निराश झालो नाही,” असं त्यांनी ( Bhaskar Jadhav ) स्पष्ट केलं.
📌 महत्वाच्या बातम्या
- लाडकी बहिण योजना: महिलांना आता 1 लाखांचं कर्ज ‘शून्य टक्के’ व्याजदराने
- गोव्यात उत्साहात साजरा झाला ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन
- ‘उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा… जीव काय, बोलतोस काय?’ ठाकरेंचा नितेश राणेंवर निशाणा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now