Share

‘उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा… जीव काय, बोलतोस काय?’ ठाकरेंचा राणेंवर निशाणा!

Uddhav Thackeray slams BJP, Rane, and Adani over Mumbai, Hindutva, and corruption

Published On: 

Nitesh Rane has warned Uddhav Thackeray over the video of Narayan Rane's arrest.

मुंबई– शिवसेना (ठाकरे गट) च्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर आणि नितेश राणेंवर जोरदार हल्लाबोल केला. हिंदी सक्ती, मुंबईतील मराठी अस्तित्व, वंश, भ्रष्टाचार आणि मनसेशी युतीच्या चर्चांवर ठाकरेंनी स्पष्ट भूमिका मांडली.

“महाराष्ट्रात हिंदी सक्ती केली जाणार नाही. हिंमत असेल तर करून दाखवा,” असं थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं. “मुंबईत मराठी-अमराठी एकत्र राहतात, पण त्यांच्यात भांडण लावून हे भ्रष्टाचार करतायत,” असा आरोपही त्यांनी केला.

Uddhav Thackeray slams BJP and Nitesh Rane

नाव न घेता नितेश राणेंवर ठाकरेंनी बोचरी टीका केली. “हिंदू-मुस्लिम विषयावर एक बेडूक ओरडतो आणि आवाज कसा? उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा! तुझी पार्श्वभूमी काय? आणि कोणावर बोलतोस?” असा थेट सवाल त्यांनी केला.

“59 वर्षांची शिवसेना झाली, पण भगवा एकच आहे. शिवसेनाप्रमुखांनी पक्षाची स्थापना मराठी माणसांच्या हक्कासाठी केली होती, शेटजींचे बूट चाटण्यासाठी नाही,” असा घणाघात ठाकरेंनी केला.

ठाकरेंनी अदानी समूहावर निशाणा साधत म्हटलं, “लाडक्या बहिणीसाठी पैसे नाहीत, पण अदानीला सगळं माफ! जागा, स्टॅम्प ड्युटी माफ केली. देवनारचं डम्पिंग ग्राऊंड देखील अदानीला दिलं जातंय.”

“ही लढाई केवळ माझी नाही, ही लढाई 1960 मध्ये मुंबई मिळवताना रक्त सांडलेल्या मराठी माणसाची आहे. ती मुंबई आपल्याला वाचवावी लागेल,” असं भावनिक आवाहन त्यांनी केलं.

राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती होणार का, या प्रश्नावर ठाकरेंनी थेट उत्तर देण्याऐवजी, “तुमचं मनात आहे ते करेन, पण होऊ नये म्हणून काही मालकांचे नोकर भेटीगाठी घेत आहेत,” असा सूचक टोला लगावला.

“आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणता, पण तुम्ही सौगात वाटता. भाजपवाले सोफिया कुरेशीला ‘दहशतवाद्यांची बहीण’ म्हणतात, आणि ट्रम्पचा फोन आल्यावर वॉर रूकवा पप्पा म्हणणारे गप्प होतात. दहशतवादी गेले कुठं…पाताळात गेले की भाजपात..फक्त दाऊदला भाजपात घ्यायचे तेवढे बाकी असल्याचा टोला ठाकरेंनी लगावला.

भाजपनं जेलच्या बाहेर स्टॉल टाकलेत…इथं येतो की तिकडे जातो. एसआयटीची एसटी झाली का…शिवसेना तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला आता भांडून चालणार नाही.हिंदू हिंदूमध्ये भांडणं लावायला सुरू केलीयत.हिंदी सक्तीची करू देणार नाही. गुजरातेत हिंदी करा सक्तीची..सू करा छे. ३ हजार कोटींचे जादा टेंडर रद्द केले…पैसे गेले कुठं? एक मंत्री स्वत:च्या अवलादीसाठी हॉटेल घेतोय. आता सतरंजीच्या खाली गेलात,तुमच्यावर उपरे नाचतायत, असे ठाकरे म्हणाले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही