Share

‘उंची पेंग्विनची,आवाज कोंबडीचा…’ ठाकरेंच्या टिकेवर राणेंची पहिली प्रतिक्रिया, सर्वच काढलं,’स्वत:चा मुलगा..’

Nitesh Rane hits back at Uddhav Thackeray over Hindutva and political legacy

Published On: 

Nitesh Rane has warned Uddhav Thackeray over the video of Narayan Rane's arrest.

🕒 1 min read

मुंबई – शिवसेना (ठाकरे गट) च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून एकनाथ शिंदे आणि भाजप आमदार नितेश ( Nitesh Rane ) राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. याला प्रत्युत्तर देताना शिंदे गटासोबतच भाजपकडूनही ठाकरेंवर कडवट टीका केली जात आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांनी ‘त्यांना आम्ही जिहादी हृदय सम्राट म्हणतो, हिंदुत्वासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिव्या घालण्याचा त्यांना अधिकार नाही’, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. “बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणूनच आज ‘ठाकरे’ ब्रँडची चिंता त्यांना सतावते. बाळासाहेबांचा वारसा चालवणाऱ्यांनी हिंदुत्वाचं काम सोडलं, म्हणूनच आमचा विरोध आहे,” असेही राणे म्हणाले.

Nitesh Rane slams Uddhav Thackeray

राणेंनी यावेळी आदित्य ठाकरेंवरही टिका करत, “स्वतःचा मुलगा कसा आहे हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे मला पेंग्विन बोलून फरक पडत नाही. स्वतःच्या मुलाची अवस्था बघा, असेही ते म्हणाले. दिनो आणि दिशा बद्दल माहिती देत आहोत आम्ही म्हणून टीका केली जाते.स्वतःच्या मुलाच नाईट लाइफ कमी केलं असत तर हे टाळत आलं असतं.आदित्य ठाकरे यांचा आवाज न बाईचा न माणसाचा. उद्धव ठाकरे यांचा बाप सिल्वर ओक की जन पथला हेच त्यांना माहीत नाही, अशी टीका त्यांनी केली. मुंबईत हिरवे झेंडे दिसणार नाही भगवे दिसणार. वरळी सांभाळता आली नाही आमदारकीला काठावर पास झालेला विद्यार्थी मुंबई लढवणार का? आदित्यला अधिकृत जाहीर करा आम्ही महापौर जाहीर करतो, असे आव्हानही त्यांनी ( Nitesh Rane ) दिले.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, या चर्चांवरही नितेश राणे यांनी बोचरी टीका केली. “मविआच्या काळात स्वतःच्या वडिलांचं नाव लावायला लाज वाटायची. राहुल गांधी मंचावर असताना ‘हिंदू हृदय सम्राट’ बोलण्याची हिंमत नाही. हा वर्धापन दिन तर इस्लामाबादमध्ये झाला पाहिजे,” असा घणाघात त्यांनी केला.

“हे राजकीय धर्मांतर आहे, राजकीय लव्ह जिहाद आहे आणि उद्धव ठाकरे हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत,” असे म्हणत त्यांनी टीकेची धार अधिक तीव्र केली. “राज्याच्या हितासाठी ते भांडत नव्हते, ती कौटुंबिक भांडणे होती,” असे सांगत, “एका बाजूला शून्य आमदार, दुसऱ्या बाजूला २० आमदार — काय होणार?” असा सवाल उपस्थित केला.

“ठाकरे ब्रँड मोठा झाला तो हिंदुत्वामुळे, पण उद्धव ठाकरेंनी सुपारी घेतली आहे. ते टिपू सुलतान आहेत. अघोरी पूजा करतात. कर्जतच्या फॉर्महाऊसवर काय काय केलं, सांगू का?” असा सवाल करत त्यांनी आरोपांची मालिकाच सुरु केली.

“धर्मांतराच्या घटनांची सुरुवात अडीच वर्षांपूर्वी झाली. कोरोना निमित्ताने मंदिरं बंद केली. टिपू सुलतानसारखा इतिहास उभा करत उद्धव ठाकरेंनी हिंदूंवर अत्याचार केलाय,” अशी जोरदार टीका त्यांनी केली. “गोगावले यांनी हिंदू पद्धतीने पूजा केली, तरी संकट आलं का? दुसरा धर्म स्वीकारला का? क्रॉस घेतलं का?” असे प्रश्न विचारत त्यांनी ( Nitesh Rane ) कटाक्ष टाकला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या