Share

जयपूरच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधील जोडप्याचा रोमान्स सार्वजनिक; व्हिडीओ व्हायरल

Couple caught romancing in Jaipur hotel room, viral video stirs online storm.

Published On: 

Jaipur couple’s intimate hotel moment filmed from street, viral video raises privacy and security questions.

🕒 1 min read

जयपूर – शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये खिडकी उघडी ठेवून सेक्स करण्यात मग्न असलेल्या जोडप्याचा व्हिडीओ रस्त्यावरून जाणाऱ्यांनी शूट करून सोशल मीडियावर टाकल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना जयपूरमधील सिव्हिल लाईन परिसरात मंगळवारी रात्री सुमारे १० वाजता घडली. या प्रकारामुळे एकीकडे वाहतुकीची कोंडी झाली, तर दुसरीकडे सोशल मीडियावर ही क्लिप व्हायरल झाली आहे.

घटनेवेळी पुलावरून वाहनांची वर्दळ सुरू होती. याचवेळी काही नागरिकांचं लक्ष समोर असलेल्या पंचतारांकित हॉटेलच्या खिडकीकडे गेलं. खिडकी उघडीच होती आणि पडदाही लावलेला नव्हता. एक जोडपं अत्यंत खासगी क्षणांत गुंतलेलं स्पष्ट दिसत होतं. हे दृश्य पाहताच काही लोकांनी आपले मोबाईल काढून व्हिडीओ शूटिंग सुरू केलं. काही क्षणांतच रस्त्यावर गर्दी झाली आणि वाहतुक ठप्प झाली.

हळूहळू हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होऊ लागला. काही तासांतच तो देशभरातील अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल झाला. यामुळे हॉटेलच्या व्यवस्थापनावरही प्रश्न उपस्थित झाले. माध्यमांनी संपर्क साधल्यावर हॉटेल प्रशासनाने सांगितले की, संबंधित रूम त्यांच्याकडे नोंदणीकृत नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
India Marathi News

Join WhatsApp

Join Now