Share

राज्यातील ५०० कोटींच्या तुरुंग घोटाळ्यावर फडणवीस गप्प का? – राजू शेट्टींचा सवाल

Raju Shetti accuses CM Fadnavis of shielding 500 crore jail scam masterminds.

Published On: 

Raju Shetti accuses CM Fadnavis of shielding 500 crore jail scam masterminds.

🕒 1 min read

कोल्हापूर – राज्यातील कारागृह विभागात तब्बल ५०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रकरण दडपल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. फडणवीसांचे निकटवर्तीय तेजस मोरे याचे आरोपी अधिकाऱ्यांशी संबंध असल्यामुळेच हे प्रकरण झाकण्याचा प्रयत्न होत असल्याचं शेट्टी म्हणाले.

शेट्टी यांनी सांगितलं की, राज्यातील विविध तुरुंगांमध्ये मागील तीन वर्षांत कॅन्टीन, रेशन आणि उपकरण खरेदी यामध्ये तब्बल ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला. या प्रकरणात तत्कालीन अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता आणि तुरुंग विभागाचे तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप आहेत. या पार्श्वभूमीवर शेट्टींनी मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि गृह सचिवांकडे चौकशीची लेखी मागणी केली होती. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

Raju Shetti exposes ₹500cr Maharashtra jail scam link

“मुख्यमंत्र्यांची वेळ मागूनही भेट दिली जात नाही. मी मुंबईत दोन दिवस थांबलो, पण त्यांनी पाच मिनिटांची वेळही दिली नाही,” असं सांगत शेट्टींनी नाराजी व्यक्त केली. फडणवीस माध्यमांसमोर म्हणतात, “पुरावे मिळाले तर कारवाई करू,” पण प्रत्यक्षात संबंधित अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.

शेट्टी म्हणाले, “या आधीही मुन्ना यादव, सुनिल झंवर (रायसोनी घोटाळा – १२०० कोटी) यांसारख्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना संरक्षण देण्यात आलं. आता सुपेकर प्रकरणही त्याच पद्धतीने दाबलं जातंय.” अमिताभ गुप्ता, जालिंदर सुपेकर, सत्यवान हिंगमिरे, प्रशांत मत्ते, शाहू दराडे, गौरव जैन, सुनील ढमाळ, अतुल पट्टेकरी या अधिकाऱ्यांची ED व CBI मार्फत तपास करण्याची मागणी शेट्टींनी केली आहे.

तेजस मोरे आणि सुपेकर यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तेजस मोरे हा ना अधिकारी, ना ठेकेदार, पण भायखळा ADG कार्यालयात आणि अधिकाऱ्यांच्या बंगल्यांवर सतत वावरतो, हे शेट्टींनी निदर्शनास आणलं. मोरेवर ४०९ व ४२० कलमांतर्गत फसवणुकीचे गुन्हे दाखल असूनही, त्याच्या गाडीला (MH-01-EJ-2707) मंत्रालयात विनातपासणी प्रवेश दिला जातो. शेट्टींनी याला ‘सरकारचा जावई’ असा टोला लगावत, सरकारवर तीव्र टीका केली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Politics Crime Kolhapur Maharashtra Marathi News Mumbai

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या