🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी (अजित पवार गट) नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. पत्नी करुणा मुंडे यांच्या पोटगीसंदर्भातील प्रकरणात, न्यायालयाने मुंडेंना चार आठवड्यांच्या आत एकूण थकबाकीपैकी 50 टक्के रक्कम म्हणजेच 21 लाख 87 हजार 500 रुपये वांद्रे न्यायालयात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्याचप्रमाणे, करुणा मुंडे यांच्या मुलीच्या पोटगीची शंभर टक्के रक्कमही न्यायालयात भरावी, असेही स्पष्ट आदेश न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या एकलपीठाने दिले. 2022 च्या ऑगस्टपासून ते 2025 च्या जूनपर्यंतच्या 35 महिन्यांत एकूण पोटगीची थकबाकी 43.75 लाख रुपये झाली आहे. याच रकमेवरून 50% रक्कम तातडीने जमा करावी, असा स्पष्ट आदेश न्यायालयाने दिला आहे.
HC directs Dhananjay Munde to deposit 50% alimony
मूळ प्रकरणात, वांद्रे येथील दंडाधिकारी न्यायालयाने करुणा मुंडेंना दरमहा 1.25 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, सुनावणीदरम्यान न्यायालयाने धनंजय मुंडेंनाच फटकारले आणि त्यांना रक्कम भरायला लावली.
कोर्टाच्या निर्णयानंतर करुणा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडेंवर आरोप केले. “मुंडे स्वतः चांगले आहेत, पण त्यांच्या मागे असलेली दलाल गँग त्यांना चुकीच्या मार्गाला लावते आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला.
त्यांनी पुढे सांगितले की, धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्या लोकांकडून सतत धमक्या येत आहेत. मोबाईलवर AI वापरून अश्लील व्हिडिओ पाठवले जात आहेत, असा आरोप करत त्यांनी वांद्रे न्यायालयात तक्रार अर्जही दाखल केला आहे. कोर्टाने मला न्याय दिला, त्यामुळे मी त्यांचे आभार मानते, असेही त्या म्हणाल्या. मात्र, “जोपर्यंत संपूर्ण रक्कम मिळत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही,” असा ठाम इशाराही त्यांनी दिला.
📌 महत्वाच्या बातम्या
- तुमची दुचाकी ‘0001’ नंबरने झळकू शकते! MH-21 CH मालिकेसाठी अर्ज सुरू
- मनसेचा उद्धव ठाकरेंना इशारा: दबाव नको, युतीचा निर्णय राज ठाकरेच घेतील
- ११,३६६ एकर वनजमिनीवर अतिक्रमण! उच्च न्यायालयाची राज्य सरकारला थेट नोटीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








