Share

देवेंद्र फडणवीस भेटलेच नाहीत! खडसेंचा थेट खुलासा आणि महाजनांना टोला

Eknath Khadse says Fadnavis meet was never planned.

Published On: 

Eknath Khadse criticizes Girish Mahajan over his relationship with a female IAS officer

🕒 1 min read

जळगाव | क्रांतीवीर खाज्याजी नाईक यांच्या स्मारकाच्या अनावरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या कार्यक्रमात भाजपमधून राष्ट्रवादी (शरद पवार गट) मध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेही उपस्थित होते. त्यामुळे दोघांची भेट होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र प्रत्यक्षात ही भेट झालीच नाही. यावर आता खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

खडसे म्हणाले, “मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी माझी भेट ठरलेली नव्हती. मी कार्यक्रमासाठी आलो होतो. जर औपचारिकरित्या भेटीचं निमंत्रण आलं असतं, तर नक्कीच भेट घेतली असती. हा कार्यक्रम शासकीय नव्हता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा होता. त्यामुळे इथे राजकीय चर्चा होईल, अशी अपेक्षा नव्हती.”

Eknath Khadse says Fadnavis meet was never planned

खडसे पुढे म्हणाले, “माझ्यासह काही आमदारांना व्हीआयपी कक्षात स्थान देण्यात आलं. व्यासपीठावर फक्त मंत्री आणि संघाचे प्रचारक होते. त्यामुळे सर्वांना स्थान मिळेल, अशी अपेक्षा नव्हतीच. आम्ही सध्या विरोधी पक्षात आहोत. मुख्यमंत्री कर्जमुक्तीची घोषणा करतात, पण आम्ही त्याबाबत मतप्रदर्शन करायला व्यासपीठावर नव्हतो, ही वस्तुस्थिती आहे. फडणवीसांची भेट झाली नाही, याची खंत नाही. गरज पडल्यास शांतपणे वेळ घेऊन मी त्यांची भेट घेऊ शकतो.”

दरम्यान, गिरीश महाजन यांनी नुकतंच एक वक्तव्य करत खडसेंनी ( Eknath Khadse ) भाजपमध्ये प्रवेश का केला नाही याचं आत्मपरीक्षण करावं, असा सल्ला दिला होता. यावर खडसेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. “गिरीश महाजन यांनी दिलेला आत्मपरीक्षणाचा सल्ला म्हणजे मोठाच विनोद आहे,” असं म्हणत त्यांनी महाजनांना टोला लगावला.

तसंच, “मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात काही गैर नाही. मी गेलेलो होतो, याचं मोठं कारण काही नाही. मात्र भाजपच्या नेत्यांना अजूनही माझं अस्तित्व खुपतंय, हेच यातून दिसतं,” असंही खडसेंनी सांगितलं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Politics Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या