Share

शिधावाटप व्यवस्थेत होणार मोठे फेरबदल; जाणून घ्या…

अंत्योदय अन्न योजनेतील धान्य वाटप पद्धतीत बदल करण्याचा सरकारचा विचार आहे. प्रति कुटुंब ३५ किलोऐवजी प्रति व्यक्ती ७ किलो धान्य देण्याच्या प्रस्तावामुळे मोठ्या कुटुंबांना अधिक फायदा होऊ शकतो.

Published On: 

शिधावाटप व्यवस्थेत होणार मोठे फेरबदल; जाणून घ्या...

Antyodaya Anna Yojana (AAY): देशातील गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी राबविण्यात येणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेच्या (AAY) धान्य वाटप व्यवस्थेत मोठे बदल करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. सध्या या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला दरमहा निश्चित ३५ किलो धान्य दिले जाते. मात्र, आता ही कुटुंब आधारित व्यवस्था बदलून प्रति व्यक्ती ७ किलो धान्य देण्याची नवीन पद्धत लागू करण्याचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे.

या प्रस्तावित बदलामुळे विशेषतः गरीब कुटुंबांना अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. कारण सध्याच्या व्यवस्थेत कुटुंबातील सदस्यांची संख्या कितीही असली तरी प्रत्येक AAY कुटुंबाला समान ३५ किलो धान्य मिळते. त्यामुळे मोठ्या कुटुंबांना मिळणारे धान्य प्रति व्यक्तीच्या तुलनेत कमी पडत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे.

सरकारने का घेतला हा निर्णय?

मानवी जीवनचक्राच्या दृष्टिकोनातून अन्न आणि पोषण सुरक्षा मजबूत करण्याच्या उद्देशाने ही सुधारणा प्रस्तावित करण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, २०१३ च्या उद्दिष्टांनुसार प्रत्येक गरजू नागरिकाला पुरेसे आणि दर्जेदार अन्न उपलब्ध करून देणे हा या बदलामागील मुख्य उद्देश आहे.

मुख्य बदल:

  • AAY कुटुंबांना प्रति कुटुंब ३५ किलोऐवजी प्रति व्यक्ती ७ किलो धान्य
  • गरीब कुटुंबांना अधिक लाभ मिळण्याची शक्यता
  • कुटुंबाच्या आकारानुसार धान्य वाटपाची नवी पद्धत लागू होण्याची शक्यता

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही