Share

“…म्हणून मी ट्रम्प यांचं अमेरिका भेटीच निमंत्रण नाकारलं”, नरेंद्र मोदींनी सांगितलं कारण

PM Modi declines Trump’s US invite due to Odisha temple visit

Published On: 

Donald Trump takes U-turn on India-Pakistan ceasefire, says “I didn’t broker it, I just helped reduce tension.” Narendra Modi

🕒 1 min read

प्रतिनिधी – कॅनडातील G7 परिषदेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना फोनवरून अमेरिका भेटीचं आमंत्रण दिलं होतं. मात्र, नियोजित कार्यक्रमांमुळे आणि विशेषतः जगन्नाथ प्रभूच्या भूमीला भेट देण्याच्या इच्छेमुळे त्यांनी हे निमंत्रण नाकारल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः भुवनेश्वर येथील जाहीर सभेत स्पष्ट केलं.

भुवनेश्वरमध्ये ओडिशातील भाजप सरकारच्या एक वर्षपूर्ती निमित्त आयोजित सभेत मोदी ( Narendra Modi ) म्हणाले, “मी दोन दिवसांपूर्वी कॅनडामध्ये G7 परिषदेसाठी होतो. तिथे ट्रम्प यांनी मला फोन केला. ते म्हणाले, ‘तुम्ही कॅनडाला आलाच आहात, तर वॉशिंग्टनलाही या, एकत्र जेवण करू.’ मी त्यांना त्यांच्या आमंत्रणाबद्दल आभार मानले आणि सांगितलं की मला प्रभू जगन्नाथांच्या भूमीत जायचं आहे. मी ट्रम्प यांचं निमंत्रण नम्रतेने नाकारलं. प्रभू जगन्नाथांची भक्ती मला इथे घेऊन आली आहे.”

Narendra Modi declines Trump’s US invite

“जनतेच्या मागणीनुसार पुरी येथील जगन्नाथ मंदिराची चारही दारे उघडण्यात आली आहेत. रत्नभंडार पुन्हा खुलं झालं आहे. मागील एक वर्षात भाजपा सरकारने सुशासन आणि जनसेवा यशस्वीरित्या पुरवली आहे,” असं मोदींनी ठामपणे सांगितलं.

https://twitter.com/NEWSDAILY123/status/1936039253265596539

📌 महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!