Dattatray Gade । पुण्याच्या स्वारगेट बसस्थानक अत्याचार प्रकरणातील (Pune Rape Case) आरोपी दत्तात्रय गाडे हा सध्या पोलीस कोठडीत असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. दत्तात्रय गाडेचे वकील साहिल डोंगरे (Sahil Dongre) यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केल्याची माहिती समोर आली होती.
अशातच आता याप्रकरणी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. डोंगरे यांना अपहरण किंवा मारहाण केली नाही तर अपघातामुळे त्यांच्या शरिरावर जखमा झाल्या आहेत. याबाबत पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये डोंगरे दारू पिऊन एका हॉटेलमधून बाहेर पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. साहिल डोंगरे यांनी सागर बार येथे रात्री 10 वाजता त्यांचे मित्र अनिकेत मस्के याच्यासोबत दारूचे सेवन केले होते.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर डोंगरे हे रात्री 11.30 वाजता आणि पहाटे 05 वाजता दिवे घाट या ठिकाणी दिसले. डायल 108/112 वर कॉल झाल्याचे आणि सासवड पोस्टे येथील अंमलदार यांना कॉल झाल्याचा देखील माहिती समोर आली आहे.
Dattatray Gade lawyers Sahil Dongre Viral CCTV video
पोलीस कंट्रोल रूमला एक व्यक्तीचा अपघात झाला असून तो बेशुद्ध आहे, असा फोन आला. डोंगरे यांनी त्यांचा अपघात झाला असल्याचे पहाटे 108 वर फोन करून सांगितले होते. एकंदरीतचे डोंगरे यांचे अपहरण झाले नसून त्यांचा रस्ते अपघात झाला असल्याची माहिती असे प्राथमिक चौकशीतुन समोर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :