Share

“न्याय मिळत नाही तोपर्यंत…”; Satish Bhosale च्या पत्नीचा मोठा निर्णय

by MHD
Satish Bhosale Wife start Hunger Strike

Satish Bhosale । शिरूर कासार येथील ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्या प्रकरणी सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले (Khokya Bhosale) याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याच्यावर हरणांची शिकार केल्याचा आरोप आहे. वन विभागाकडून खोक्याचं घर अतिक्रमण असल्याचं सांगत त्यावर कारवाई केली.

त्यानंतर त्याचे घर अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिले. खोक्याचं कोणी आणि कशासाठी पेटवून दिले? याची माहिती अजून समोर आली नाही. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. अशातच आता सतीश भोसलेची पत्नी तेजू भोसले (Teju Bhosale) बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत. (Satish Bhosale Wife Hunger Strike for Justice)

“घर पाडणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा. सरकारने आम्हाला त्याच गावात जागा उपलब्ध करून देऊन तिथे पक्के घर बांधून द्यावे. मारहाणीप्रकरणी सतीश भोसले त्याचे तीन भाऊ आणि वडील यांची निर्दोष मुक्त करावे,” अशी मागणी सतीश भोसलेच्या पत्नीने केली आहे.

तसेच फरार आरोपींना अटक करावी. माझा नवरा, आमचा परिवार आणि पारधी समाजाच्या विरोधात सुरु असलेला खोटा अपप्रचार तातडीने थांबववा, अशाही मागण्या सतीश भोसलेच्या पत्नीने सरकारकडे केल्या आहेत.

Satish Bhosale Wife Demand Justice

“आम्हाला घरदार नसून आमची लेकर उन्हात बसत आहेत. आमच्या महिलांना मारहाण केली. गावगुंडे कोणते आहेत त्यांना शोधून घेतला पाहिजे. जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील, अशी प्रतिक्रिया तेजू भोसले यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या :

Satish Bhosale wife has made some demands to the government. How many of them will the government accept? It is important to see.

Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now