Suresh Dhas । शिरूर तालुक्यातील बावी गावात ढाकणे पितापुत्रांना मारहाण करणाऱ्या आणि हरणांची शिकार करणाऱ्या सतीश भोसले (Satish Bhosale) उर्फ खोक्या भोसलेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी देखील दिली आहे.
त्याने वनविभागाच्या जागेवर बांधलेले घर पाडण्यात आले आहे. इतकेच नाही तर त्याचे पाडलेले घर अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिले. याप्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया देत अजब दावा केला आहे.
“सतीश भोसले याचे घर पाडण्यासाठी खूप घाई केली. या प्रकरणाची मी माहिती घेत आहे. काही जणांचे असे मत आहे की सतीश भोसलेची जमीन वनविभागाची तर काही जण असे म्हणत आहेत की ती जमीन वाटप केली आहे. मी याबाबत कलेक्टर आणि वनविभागाला विचारणा करणार आहे,” असे धस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सतीश भोसले याने ज्या ठिकाणी ढाकणे पिता पुत्रांना मारहाण केली होती, तिथेच त्याला आज पोलिसांनी आणलं आहे. त्या दिवशी काय घडलं? याची माहिती घेण्यासाठीच पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे.
Suresh Dhas on Satish Bhosale
सतीश भोसले याच्या कोठडीचा आज दुसरा दिवस पोलीस त्याच्याविरोधातील पुरावे गोळा करत आहे. त्याने गुन्ह्यात वापरलेले हत्यार, गुन्ह्यात वापरलेल्या गाडीचा शोध घेतला जातोय. त्यामुळे सतीश भोसलेच्या अडचणी वाढत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या