Dhananjay Munde । अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. अशातच आता धनंजय मुंडे यांच्या मामी सारंगी महाजन (Sarangi Mahajan) यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे.
“धनंजय मुंडे पहिल्यांदा गोड बोलले. त्यानंतर त्यांनी धाक दाखवत जमिनीची फसवणूक करून रजिस्ट्री करून घेतली. अनुसया हॉटेलमध्ये बोलावून घेतले आणि तुम्हाला तुमची जागा मिळून देतो, असे आश्वासन दिले. पण त्यांच्या जमिनीची खोटी सही घेऊन 22 लाख रुपयांमध्ये व्यवहार पूर्ण केला,” असा गंभीर आरोप सारंगी महाजन यांनी केला.
“धनंजय मुंडे यांचे पीए प्रशांत जोशी आणि गोविंद मुंडे यांनी पैशांसाठी दबाव टाकला. न्यायालयात अंबाजोगाई येथे याप्रकरणी दावा दाखल केला आहे. या प्रकरणाचा सेटलमेंटद्वारे तोडगा काढावा,” अशी विनंती महाजन यांनी केली आहे.
Sarangi Mahajan on Dhananjay Munde
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर त्यांच्या मामी सारंगी महाजन सतत गंभीर आरोप करत असतात. अशातच आता पुन्हा एकदा सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावर आता धनंजय मुंडे काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :