Sanjay Raut । काल काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
“पडद्यामागे रुसवे फुगवे, आदळआपट उघडपणे दिसत आहे. नाना पटोले यांनी फार लवकर भांडं वाजवलं. त्यांनी जरा थांबायला पाहिजे होतं. वर्षभराने राज्याचे राजकारण पुन्हा बदलणार आहे,” असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
“एकनाथ शिंदेंचा भगव्या रंगाशी काहीच संबंध नाही. ते केवळ भाजपच्या ताटाखालचे मांजर आहे. सगळे झेंडे भाजपचे असल्याने भगव्या झेंड्याची चिंता करू नये. नाना पटोले यांच्या ऑफरमध्ये सुधीर मुनगंटीवार आहेत का? हे तपासा,” असा टोला राऊत यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, “राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचा सरकार येईल हे कोणी स्वप्नात पाहिलं होतं का? राजकारणात सर्व शक्यता असून त्याचा सकारात्मक विचार करायला पाहिजे. ऑफरबाबत आम्ही नाना पटोले यांच्याशी चर्चा करू,” असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
Sanjay Raut on Nana Patole
दरम्यान, नाना पटोले यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफरमुळे मविआमध्ये धुसफूस सुरु आहे का? असा सवाल उपस्थित होत होता. पण राऊत यांनी यावर स्पष्टीकरण देत सरकारवर निशाणा साधला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :