Tabu । अभिनेत्री तब्बू ही अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अजूनही चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. आज 53 व्या वर्षीही ती मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे. इतकेच नाही तर सोशल मीडियावर (Social media) ती कायम सक्रिय असते.
तब्बूचं वय 53 वर्ष आहे. परंतु, ती अजूनही सिंगल आहे. बॉलिवूडच्या अनेक लोकप्रिय अभिनेत्यांसोबत तब्बूचे नाव जोडले गेले. यात सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn), संजय कपूर (Sanjay Kapoor) यांचाही समावेश आहे. पण ती कधीच त्यांच्याबद्दल उघडपणे बोलली नाही.
महत्त्वाचे म्हणजे तब्बू आणि नागार्जुन (Nagarjun) यांच्या अफेअरच्या चर्चाही सुरु होत्या. ते दोघे अनेक चित्रपटांदरम्यान भेटत असायचे. कालांतराने दोघे एकमेकांच्या जवळ आले. त्यांचे नाते 10 वर्षे टिकले असेही बोलले जाते. नागार्जुनसोबत तब्बूला संसार करायचा होता.
पण त्यावेळी नागार्जुन विवाहित होता. त्यामुळे ज्यावेळी तब्बूला त्यांच्या नात्याबद्दल असुरक्षितता वाटू लागली त्यावेळी ते दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले, अशी माहिती आहे. नागार्जुनपासून दूर झाल्यानंतर तब्बूने कधीच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल स्पष्ट बोलली नाही.
Tabu untold love story
दरम्यान, तब्बूच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. 53 व्या वर्षीही चाहत्यांमध्ये तिची क्रेझ आजही कमी झाली नाही. सतत ती कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. तिचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.
महत्त्वाच्या बातम्या :